Nitin Gadkari 64th Birthday: केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अनेक मान्यवरांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
Nitin Gadkari | (Photo Credits: Twitter)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज (27 मे) वाढदिवस (Nitin Gadkari 64th Birthday) आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह अनेक राजकीय आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांच्याकडे सध्या रास्तेवाहतूक, राष्ट्रीय महामार्ग आणि जहाज बांधणी तसेच जलसंसाधन, नदी विकास आदी मंत्रालयांचा कारभार आहे. या आधी 2010 ते 2013 या काळात ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत. नागपूर जिल्ह्यात जन्मलेले नितीन गडकरी सध्या देशातील एक प्रमुख नेते आहेत. त्यांनी कॉमर्स विषयातून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच, कायदा आणि व्यवसाय व्यवस्थापन विषयांतही त्यांनी शिक्षण घेतले आहे. यासोबतच ते एक उद्योगपतीही आहेत.

नितीन गडकरी हे राजकारणी असण्यासोबत एक उद्योगपतीही आहेत. ते बायो-डीजल पंप, साखर कारखाना, इथनॉल ब्लेंन्डिंग संयत्र, या शिवाय इतरही अनेक उद्योग व्यवसायांमध्ये त्यांनी पदार्पण केले आहे. नितीन गडकरी यांनी 1976 मध्ये नागपूर विद्यापीठातून शिक्षण घेत असतानाच राजकारणात प्रवेश केला. ते भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात आले. त्यांनी काही काळ भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपदही भूषवले. विशेष म्हणजे वयाच्या 23 व्या वर्षी गडकरी यांनी हे पद भूषवले.

सुरेक्ष प्रभु ट्विट

सुप्रिया सुळे ट्विट

नहहरी झिरवळ ट्विट

चंद्रकांत पाटील ट्विट

चंद्रकांत खैरे ट्विट

1995 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली. चार वर्षांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या कामाचीही चांगलीच प्रशंसा झाली. पुढे सत्ता गेल्यानंतर नितीन गडकरी यांनी विधानपरीषदेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी भूषवली आहे. 20 वर्षे विधानपरिषद सदस्य राहिल्यानंतर 2008 मध्ये ते शेवटचे विधानपरिषदेत निवडूण गेले. त्यानंतर ते केंद्रात गेले आणि आता राष्ट्रीय पातळीवर ते काम करत आहेत.