National Sports Day 2021: 'हॉकीचे जादूगार' मेजर ध्यानचंद यांचा आज 119वा जन्मदिवस, भारताला खेळातून मिळवून दिली नवी ओळख
मेजर ध्यानचंद (Photo Credits: Wikimedia Commons)

National Sports Day 2021: आज (29ऑगस्ट) संपूर्ण देश हॉकीच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आठवण काढत आहेत.कारण आज मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांचा 119 जन्मदिवस साजरा केला जात आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा भारतात नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून साजरा केला जातो. या वर्षी टोकियो ऑलिंम्पिकमध्ये भारताने आपली उत्तम कामगिरी करत सात पदक आपल्या नावावर केली आहेत. याच कारणास्त या दिवसाची शान अधिक वाढली गेली आहे.

मेजर ध्यानचंद यांच्यासारखा उत्कृष्ट हॉकीपटू आजवर उदयास आलेला नाही. मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या खेळातील कामगिरीमुळे हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यांच्या या खेळाने भारताला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.(Mother Teresa Birth Anniversary: मदर टेरेसा यांनी भारताला आपली कर्मभूमी कशी निवडली?)

ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला होता. मेजर ध्यानचंद यांनी भारतासाठी साल 1926-1949 पर्यंत हॉकी खेळात आपली कामगिरी दाखवली. आपल्या करियरच्या दरम्यान, मेजर ध्यानचंद यांनी भारताला 1928, 1932 आणि 1936 मध्ये ऑलिंम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवून दिले होते. तर ध्यानचंद यांच्या खेळाची चर्चा विदेशात सुद्धा केली जात होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त केले खास ट्विट-

Tweet:

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार हा मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ देण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले की, जनतेच्या इच्छेचा सन्मान करत आता खेल रत्न अवॉर्ड्स आता मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड्सच्या नावाने ओळखला जाणार आहे.