National Navy Day 2020 HD Images: भारतात दरवर्षी 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय नौदल दिन (Indian Navy Day) साजरा केला जातो. भारतीय सशस्त्र दलाच्या नौदल सैन्याने केलेल्या कामगिरी आणि भारतीय नौदलाबद्दल (Indian Navy) जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यापूर्वी रॉयल इंडियन नेव्ही (Royal Indian Navy) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय नौदलाची स्थापना ब्रिटिशांनी 1608 मध्ये केली होती. भारतीय नौदलाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे भारतीय समुद्री मार्गाचे परकीय घुसखोरांपासून संरक्षण करणे आणि त्या प्रदेशावरील कोणत्याही हल्ल्याचा सामना करणे आणि देशाच्या सागरी सीमेची सुरक्षा सुनिश्चित करणे. भारताचे राष्ट्रपती (President of India) हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर आहेत. आपतकालीन नैसर्गिक आपत्तींच्या काळात मानवतावादी मदत करण्यातही नौदल महत्वाची भूमिका बजावते. हे HD वॉलपेपर्स आणि फोटो शेअर आजचा हा दिवस साजरा करा.
1971 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या कर्तृत्वाची कबुली देण्यासाठी राष्ट्रीय नौदल दिन साजरा केला जातो. 4 डिसेंबर, 1971 रोजी रोजी भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट यशस्वीपणे पार पाडला आणि चार पाकिस्तानी नौदलाची जहाजे बुडवली ज्यात शेकडो पाकिस्तानी नेव्ही कार्मिक ठार झाले. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात आपले प्राण गमावलेल्या भारतीय नौदलाच्या कर्मचार्यांच्या स्मृतीदिन म्हणूनही आजचा दिवस साजरा केला जातो. या खास दिवशी आपण हे Messages, Whatsapp Stickers एकमेकांना पाठवून आजचा दिवस साजरा करू शकता.
राष्ट्रीय नौदल दिनाच्या काही दिवसांपूर्वी, नेव्ही आठवडा पाळला जातो. नेव्ही आठवड्यात अनेक कार्यक्रम क्रम आयोजित केले जातात, नेव्ही हाफ मॅरेथॉन देखील आयोजित केले जाते आणि बोटिंग द रिट्रीट आणि टॅटू समारंभ देखील होतात. भारतीय सशस्त्र दलाच्या नौदल सैन्याच्या यशाचे स्मरण करून, जगासमोर आपली शक्ती दर्शवणारी, तसेच भारतीय नौदलाच्या पूर्व सैनिकांची सेवा करण्याचे निर्भयता आणि निर्धाराची आठवण म्हणून राष्ट्रीय नौदल दिन हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे.