National Best Friends Day 2024: राष्ट्रीय सर्वोत्तम मित्र दिन निमित्त Texts Wishes, WhatsApp Messages; शुभेच्छांद्वारे साजरा करा मैत्रीचा उत्सव
National Best Friends Day | (Photo credit: archived, edited, representative image)

मित्र जवळचे असोत की दूरचे. खरे तर मैत्रीत आपला-परका असे काहीच नसते. मित्र केवळ मित्र (National Best Friends Day Texts Wishes) असतात. कोणताही स्वार्थ, आडपडदा न ठेवणारे. सरसोट स्वभावाचे. आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांचे साक्षीदार. आरशासारखे लख्ख.. आणि सदैव तत्पर प्रतिमा उजळण्यासाठी. स्वत:ची आणि समोरच्याची. म्हणूनच अशा या मित्रांसाठी आपण नेहमीच काही ना काही करत असतो. पण, त्यामध्ये कोणचीच औपचारिकता नसते. खरे तर वर्षातून किमान एखादा तरी असा औपचारीक दिवस असावा. ज्यामुले मित्राला त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान सांगता येईल आणि समजू शकेल. म्हणूनच साजरा केला जातो राष्ट्रीय मैत्री दिन. भारतात 8 जून हा दिवस बेस्ट फ्रेंड्स डे (Best Friends Day) म्हणून ओळखला जातो, प्रामुख्याने युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये. हा दिवस आपल्या मित्रांबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची एक विशेष संधी देतो. म्हणून अशा या मैत्रीदिनाच्या खास क्षणाला आपण आपल्या मित्राला व्हॉट्सॲप मेसेज, कोट्स, GIF ग्रीटिंग्स, SMS द्वारे देखील शुभेच्छा देऊ शकता. ज्या तुम्हाला येथे तयार स्वरुपात मिळतील. (National Best Friends Day WhatsApp Messages)

मैत्री दिन कसा साजरा कराल?

बेस्ट फ्रेंड्स डे साजरा करतानाच या अनोख्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट प्रथा नाहीत. पण हा दिवस वैयक्तीक आनंद म्हणून साजरा करता येऊ शकतो. त्यासाठी आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेणे, सोशल मीडियावर मनापासून पोस्ट शेअर करणे, ड्रिंकसाठी बाहेर जाणे, विचारशील संदेशांची देवाणघेवाण करणे आणि चित्रकला, नृत्य किंवा रॉक क्लाइंबिंग यांसारख्या बॉन्डिंग यांसारख्या कृतींद्वारे हा दिवस साजरा करण्याचे लोकप्रिय मार्ग आहेत. (हेही वाचा, National Best Friend Day 2022: नॅशनल बेस्ट फ्रेंड डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत मित्रांचा दिवस करा खास!)

बेस्ट फ्रेंड्स डे: शुभेच्छा आणि संदेश

  • "आपण कुठेही गेलो किंवा आपण कितीही मोठे झालो तरी आपले बंध आयुष्यभर अतूट राहतील. माझ्या जिवलग मित्राला फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा."
  • "राष्ट्रीय मित्र दिनाच्या शुभेच्छा! आमची सुंदर मैत्री सदैव अशीच राहू दे."
  • "तुम्ही मला भेटलेले सर्वात दयाळू, मजेदार आणि सर्वात उपयुक्त व्यक्ती आहात. राष्ट्रीय मित्र दिनाच्या शुभेच्छा!" (हेही वाचा, Friendship Day 2022: बॉलिवूडचे 'हे' चित्रपट करून देतील तुम्हाला मैत्रीची आठवण, तुमचा Friendship Day होईल खास)
  • "माझी बेस्टी असल्याबद्दल धन्यवाद! बेस्ट फ्रेंड्स डेच्या शुभेच्छा!"
  • "आम्ही मैलांच्या पलीकडे आहोत, पण आमच्या मैत्रीत काही अंतर नाही. मी तुम्हाला फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देतो."
  • "तुझ्या सांसर्गिक हसण्याने तू माझे जग उजळले आहेस आणि मला तुझ्या सभोवताली आनंद वाटतो. तू मला कठीण काळात आशा देतोस आणि प्रत्येक वाईट दिवस संपत असताना मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतो."
  • "कठीण काळात आमच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या सर्व आश्चर्यकारक लोकांना राष्ट्रीय मित्र दिनाच्या शुभेच्छा."
  • "तुला माझा सर्वात चांगला मित्र मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो! बेस्ट फ्रेंड्स डेच्या शुभेच्छा, मित्रा!"

मैत्रीदिनामित्त केले जाणारे सेलिब्रेशन व्यक्तिनुरुप वेगवेगळे असू शकते. ज्यमध्ये तुमच्या मित्रासोबत तुमच्या मैत्रीचे बंध किती घट्ट आहेत. यांवर बरेच काही अवलंबून असू शकते. त्यामुळे आपले मित्र आणि आपण एकत्र येऊन या खास दिवसाचा आनंद साजरा करण्याचे स्वरुप ठरवू शकता.