
तमिळनाडू (Tamil Nadu) मधील मदुराई (Madurai) येथील मुनियांदी देवीच्या मंदिरात दरवर्षी मुनियांदी सोहळ्याचे आयोजन केले जाते. तर या महोत्सवाचे खास कारण म्हणजे देवीचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना मटण बिर्याणी प्रसाद म्हणून दिली जाते. यावर्षी देखील तब्बल 8 हजार भाविकांना बिर्याणीचा प्रसाद देण्यात आला.
समाजाची परतफेड म्हणून हा महोत्सव साजरा केला जात असल्याचे एका हॉटेल मालकांनी सांगितले आहे. तसेच हॉटेलमधील पहिल्या ग्राहकाकडून मिळणारी रक्कम ही मुनियांदी देवीच्या महोत्सावासाठी बाजूला काढून ठेवली जाते. तर मदुराई येथे शेतकऱ्यांची मुनियांदी ही देवी कुलदैवत मानली जाते. त्यामुळे शेतकरीही या देवीच्या नावावरुन आपल्या हॉटेलचे नाव ठेवतात. तसेच हॉटेलमध्ये खास मेन्यू म्हणून मटण बिर्याणी मिळते.(हेही वाचा-Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेबद्दल '8' खास गोष्टी)
यंदाच्या देवीच्या या महोत्सवासाठी 2 क्विंटल तांदूळ, 100 बकरे आणि 600 कोंबड्यांची कत्तल केल्याचे सांगितले जात आहे. तसेच आसपासच्या गावातील मंडळींना या प्रसादाचे वाटप करण्यात येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.