Margashirsha Guruvar Vrat 2018 Date: कार्तिक पौर्णिमेनंतर हिंदू पंचांगाच्या मार्गशीर्ष या 9 व्या महिन्याला सुरूवात होते. धार्मिक दृष्ट्या हा महिना पवित्र महिन्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने सवाष्ण महिला या महिन्यात उपवास, हळदीकुंकू आणि महालक्ष्मीचं व्रत ठेवतात. तसेच अनेकजण या महिन्यात मांसाहार करणं टाळले जाते. यंदा मार्गशीर्ष महिना 8 डिसेंबर 2018 ते 6 जानेवारी 2019 पर्यंत आहे. या महिन्याभराच्या काळात प्रत्येक गुरूवारी महालक्ष्मीची पूजा, महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. महालक्ष्मी गुरूवार व्रताची कथा नेमकी काय ?
महालक्ष्मी व्रताचं वेळापत्रक
महालक्ष्मी ही धनधान्य, समृद्धी आणि पैशाची देवता आहे. दर गुरूवारी तिची पूजा केली जाते. मग पहा मार्गशीर्ष महिन्यात पवित्र गुरूवार कोणते ?
- पहिला गुरूवार 13 डिसेंबर 2018
- दुसरा गुरूवार 20 डिसेंबर 2018
- तिसरा गुरूवार 27 डिसेंबर 2018
- चौथा गुरूवार 3 जानेवारी 2019
चौथ्या म्हणजेच शेवटच्या गुरूवारी सवाष्ण महिला घरगुती हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. एकमेकींना भेटवस्तू देतात. गोडाधोडाच्या पदार्थांनी उपवास संपवले जातात. दुसर्या दिवशी गुरूवारी बसवलेल्या घटाचं उद्यापन केलं जाते. Margashirsha Mahalakshmi Vrat : जाणून घ्या कसे करावे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत, पूजेची मांडणी आणि विधी
मार्गशीर्ष पौर्णिमा देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यंदा मार्गशीर्ष पौणिमा 22 डिसेंबर 2018 दिवशी आहे. यादिवशी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिना शनिवार 5 जानेवारी 2019 या दिवशी संपणार आहे.