Marathi Bhasha Diwas 2021 Messages: 27 फेब्रुवारी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांची जयंती. वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांना साहित्य विश्वातला मानाचा 'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त झाल्यानंतर त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिन' (Marathi Language Day) म्हणून साजरा केला जाऊ लागला. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिनामाचा असणारा हा दिवस. या दिवशी राज्य सरकार, विविध संस्था यांच्याकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाअंतर्गत मराठीची गोडी सर्वदूर पसरावी यासाठी उपक्रम राबवले जातात. दरम्यान, मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा आपल्या मराठमोळ्या बांधवांना देण्यासाठी तुमच्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, Greetings घेऊन आलो आहोत. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) या माध्यमातून हे शुभेच्छा संदेश शेअर करुन तुम्ही मातृभाषेचा अभिमान जागवू शकता.
सध्याच्या परदेशी भाषांच्या प्रभावात मराठी भाषा टिकवणं आव्हानात्मक झालं आहे. मराठी भाषेची गोडी पुढील पीढीपर्यंत पोहचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे. मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत आपण त्या दृष्टीने एक पाऊल नक्कीच टाकू शकतो. (Marathi Rajbhasha Din 2021 Wishes: मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन सातासमुद्रापार पसरू दे मराठी भाषेची महती)
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा शब्द,
माझे विचार,
माझा श्वास,
माझी स्फूर्ती,
माझ्या रक्तात मराठी,
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत
आमची माय मराठी
अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते
आमची माय मराठी
संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे
आमची माय मराठी
नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही
आमची माय मराठी
मराठी भाषा दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
मराठी भाषा दिनानिमित्त करू मराठी भाषेचा सन्मान
राखू मराठीचा अभिमान आणि करू मराठीचा जयजयकार
मराठी भाषा दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा!
मराठी भाषेचा अभिमान केवळ एका दिवसापुरता मर्यादीत न ठेवता भाषेवर अखंड प्रेम करत ती अधिकाधिक समृद्ध करण्याचा आणि मराठीतील साहित्याचा ठेवा जपण्याचा प्रयत्न करुया.