
Marathi Bhasha Din 2021 Wishes In Marathi: 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे केवळ बोलण्यापुरता नव्हे तर प्रत्यक्षात आणण्याची वेळ आहे. मराठी भाषाचा मान, सन्मान कायम राखला जावा आणि येणा-या प्रत्येक पुढीला मराठी भाषेचे महत्व कळावे राज्यभरात 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Din) साजरा केला जातो. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. यंदाही हा दिवस साजरा करण्यात येईल. मात्र कोरोना व्हायरसमुळे काही बंधने आल्याने आपण मोठ्या स्वरुपात हा कार्यक्रम साजरा न केलेला बरा... मात्र तुम्ही एकत्रितरित्या न जमता सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
मराठी भाषा दिनानिमित्त आपण फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), ग्रीटिंग्सच्या (Greetings) माध्यमातून तुम्ही मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा पाठवू शकता. आपल्या मायबोलीची किर्ती सातासमुद्रापार पसरविण्यासाठी याहून चांगला दिवस असूच शकत नाही.
मराठी भाषा आहे अमुच्या महाराष्ट्राची शान
भजन, किर्तन, गारुड ऐकून हरपून जाते भान
अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व
मराठी भाषा दिन आनंदाने साजरे करू सर्व
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हेदेखील वाचा- Marathi Bhasha Din 2021: 'या' कारणामुळे कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन!
रुजवू मराठी भाषा
खुलवू मराठी भाषा
जगवू मराठी भाषा
येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल
अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अभिमान मराठी असल्याचा
गौरव मराठी भाषेचा
मराठी राजभाषा दिन साजरा करून
मान राखूया मराठी भाषेचा
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

मराठी भाषा फक्त भाषा नाही
तर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहे
भडकली तर तोफ आहे
फेकली तर गोफ आहे
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

नाती टिकविण्यासाठी मराठी भाषेचा घेतला जातो आधार
वेळप्रसंगी याच मराठी भाषेला येते तलवारीची धार
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

या मराठी भाषेतून अनेक लेखक, कवी, संत आपल्या महाराष्ट्रात घडले. ज्यांनी आपल्या वाणीतून मराठीचा महिमा दाही दिशा पसरविला. तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम आपले आहे. त्यामुळे मराठी भाषा दिनानिमित्त या शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा ख-या अर्थाने गौरव करा.