![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/teaser-1-380x214.jpg)
Mahatma Jyotiba Phule Marathi Quotes: महत्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule ) यांची आज जयंती. आज इतकी वर्षे उलटूनही महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेले विचार आणि घेतलेली भूमिका काळाच्या कसोटीवर टीकून आहे. यातच त्यांच्या विचारांची ताकद आणि सामर्थ्य दिसून येते. ज्यांचे विचार काळाच्या कसोटीवर शर्व शक्यतांना आणि दावे प्रतिदावे यांना पूरुन उरतात तोच खरा विचारवंत. फुले यांचे विचार पाहता लोकांनी त्यांना 'महात्मा' ही लोकपदवी का दिली हे ध्यानात येते. ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार सर्व प्रकारच्या चाली रिती, रुढी-परंपरा, जाती, धर्म यांचे जोखड फेकुन देतात. बुरसटलेल्या विचारांची जळमटं काढून फेकतात. हे विचार मांडताना त्यांना त्या काळातील संकुचीत वृत्तीच्या कर्मठ लोकांनी कमी त्रास दिला असे मुळीच नाही. तरीही संकुचितांचे साखळदंड तोडण्यास ज्योतिबा यशस्वी झाले. त्यांनी लक्षवधी बहुजनांना दिशा दाखवली. अशा या ज्योतिबांचे यूगप्रवर्तक 10 विचार. खास त्यांच्या जयंतीनिमित्त.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे यूगप्रवर्तक विचार
कोणताही 'धर्म' ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि 'चातुर्वण्य' व 'जातिभेद' ही निर्मिती मानवाचीच आहे. - महात्मा फुले
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/1-1.jpg)
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
- महात्मा फुले
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/2.jpg)
नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे - महात्मा फुले
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/3.jpg)
कष्टाने जगण्याची धमक नसणारे लोक सन्याशी, भिक्षुक होतात. प्रपंच खरा नाही, व्यर्थ आहे, असा भ्रम ते प्रपंचातील व्यक्तिंमध्ये निर्माण करतात. - महात्मा फुले
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/4.jpg)
सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती. - महात्मा फुले
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/5.jpg)
निर्मात्याने एकंदर सर्वच प्राणीमात्रांना निर्मिताना मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्मिले आहे. त्यास आपापसातील सर्व कक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ बनवले आहे. - महत्मा फुले
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/6.jpg)
निर्मात्याने सर्व स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. - महत्मा फुले
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/7.jpg)
जे कोणी आपले कुटुंब, भाऊबंद, सगेसोयरे, इष्टमित्र आणि साथीदारांना आपल्यासह श्रेष्ट मानून इतर कोणाही स्त्री-पुरुषांस किंवा एकंदर मानव प्राण्यास पिढीजातपणे अथवा कपटाने अपवित्र किंवा नीच मानत नाहीत त्यास 'सत्यवर्तनी' म्हणावे. - महत्मा फुले
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/8.jpg)
स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे. - महात्मा फुले
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/9.jpg)
महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव जोतीराव उर्फ जोतीबा गोविंदराव फुले. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 या दिवशी झाला. त्यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील कटगुण. त्यांच्या आईचे नाव होते चिमणाबाई. पेशव्यांच्या काळात ज्योतिरावांचे वडील आणि चुलते यांचे फुले पुरविण्याचे काम होते. त्यावरुन त्यांना फुले हे आडनाव पडले. मात्र, त्यांचे मूळ आडनाव गोरे असल्याचे लोक सांगतात. पुढे त्यांचे कुटुंब पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे. आजघडीलाही त्यांच्या नावचा सातबाराचा उतारा आहे. तसेच, फुले अडनावाची अनेक कुटुंबेही खानवडी येथे आहेत. 28 नोव्हेंबर 1890 मध्ये फुले यांचा मृत्यू झाला.