
Mahatma Gandhi Quotes: स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणारे महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होत जनसेवा करण्याची इच्छा असलेल्या गांधीजींची 30 जानेवारी 1948 रोजी नथूराम गोडसे यांनी हत्या केली. आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे व्रत जपणाऱ्या गांधीजींचा अंत हत्येने झाला. त्यामुळे हा दिवस शहीद दिवस म्हणूनही साजरा केला जातो. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे अनमोल विचार शेअर करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करुया. महात्मा गांधींचे विचार आपल्याला शांततेच्या मार्गावर नेत जीवानाचे सार सांगतील. (Mahatma Gandhi Punyatithi 2021: महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारा अभिवादन करा भारताच्या राष्ट्रपित्याला)
देशातील अत्यंत गरीब जनेतला इंग्लंडच्या सामर्थ्याशी लढा देण्यास गांधीजींकडे कोणतेही शस्त्र नव्हते. अशा भारतीय जनतेला सत्याग्रहासारखे विलक्षण शस्त्र महात्मा गांधीजींनी दिले. यामुळे या लढाईत पुरुष, स्त्रिया, मुले सर्वच सामील झाले. छोडो भारत, चले जाव, करेंगे या मरेंगे या गांधींजींच्या घोषणांंनी देश पेटवून उठला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र्य भारताचे स्वप्न साकार झाले.
महात्मा गांधी यांचे विचार!





गांधीजींचा जन्मदिन गांधी जयंती म्हणून देशभरात साजरा केला जातो. तर पुण्यतिथीचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. अस्पृश्यांसाठी केलेल्या कार्यामुळे लोक त्यांना 'बापूजी' म्हणू लागले. तर गांधीजींच्या देशकार्यातील प्रचंड योगदानामुळे 6 जुले 1944 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना 'फादर ऑफ द नेशन' असे संबोधले. त्यानंतर त्यांना 'राष्ट्रपिता' म्हणून नवीन ओळख मिळाली.