
Mahatma Gandhi Death Anniversary 2021: भारताचे राष्ट्रपिता अशी ओळख असणारे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची यंदा 73 वी पुण्यतिथी आहे. जगाला अहिंसा, शांतता, सत्य या मूल्यांचा वसा देणारे बापूजी यांनी 30 जानेवारी 1948 दिवशी जगाचा निरोप घेतला. नथुराम गोडसे यांनी गांधीजींना गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. गांधीजींचे विचार आणि त्यांनी दिलेल्या शिकवणींचा वसा जपत आज भारत वाटचाल करत आहे. मग यंदा त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या राष्ट्रपित्याला सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप स्टेट्स(WhatsApp Status) , मेसेजेस (Messages), कोट्स (Quotes), Signal Messages द्वारा अभिवादन करणारे खास फोटोज शेअर करून वंदन करायला विसरू नका. भारतामध्ये महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणजे 30 जानेवारी हा शहीद दिवस (Shahid Diwas) म्हणून पाळला जातो.
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग महात्मा गांधीजींनी सगळ्यात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला लढा उभारला. नंतर भारतामध्ये आल्यानंतरही येथील स्थिती पाहून त्यांनी भारताला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीमधून मुक्त करण्यासाठी प्रबोधन केले. प्रसंगी स्वतः काही लढ्यांचं नेतृत्त्व केले. अखेर 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांचा हट्टाहास पूर्ण झाला. पण या लढ्यात शांतता, अहिंसेचा वापर करून त्यांनी ब्रिटिशांना झुकावलं आणि जगाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडले. नक्की वाचा: महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ UK मध्ये विशेष कॉईन बनवण्याबाबत विचार सुरू.
महात्मा गांधी पुण्यतिथी





उच्चशिक्षित असणारे बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांनी सार्या भौतिक सुखांवर पाणी सोडून देशासाठी आपालं आयुष्य वेचलं. 1930 मध्ये टाइम मासिकाने गांधी यांना ‘द मॅन ऑफ दी इयर’ म्हणून संबोधित केले होते. तर गांधीजींना महात्मा ही उपाशी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली आहे. गांधीजींचा जन्मदिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.