राज्यातील मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश राज्यात कानपूर, लखनऊ येथेही दिसला ईदचा चांद. देशभरातील विविध ठिकाणी चंद्र दर्शन. भारतभर उद्या साजरी होणार रमजान ईद.
Maharashtra Kolhapur and Solapur Eid Moon Sighting 2019 Eid Al Fitr Announcement Live Updates: चंद्र दर्शन होताच महाराष्ट्रात सुरु होणार ईदचा उत्साह; सोलापूर ,कोल्हापूर येथील घडामोडींचे येथे जाणून घ्या लाईव्ह अपडेट
Eid Moon Sighting in Maharashtra (Kolhapur and Solapur): मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणाऱ्या रमजानच्या महिन्यातील आज 29 वा रोजा आहे. चंद्रदर्शनाने या महिन्याची सांगता होईल. ईदचा चंद्र पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता असेल. महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर या शहरांमध्ये आज संध्याकाळी ईदचा चाँद दिसू शकतो. त्यानंतर ईदचा सण साजरा केला जाईल.
ईदचा चाँद दिसल्यानंतर महिनाभर चालू असलेला रोजा सोडला जाईल. ईदच्या सणानिमित्त अनेक मुस्लिम बांधव एकत्र येत एकमेकांची गळाभेट घेऊन 'ईद मुबारक' अशा शुभेच्छा देतात. मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. या दिवशी नवीन पोशाख घालून लोक एकत्र जमतात. त्या ठिकाणाला 'ईदगाह' म्हणतात. ईदनिमित्त नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी होतात. भेटवस्तू, गिफ्ट्स आणि पंचपक्वान्न यांची रेलचेल असते. (Eid 2019 Special Phirni Recipe: नात्यांमध्ये गोडवा आणणारी मुस्लिम पद्धतीची फिरनी एकदा चाखाच, पाहा रेसिपी)
वर्षातून एकदा येणाऱ्या या सणाची सर्व मुस्लिम बांधव आतुरतेने वाट पाहत असतात. लहान-थोरांना आनंद देणारा या सणाला चंद्रदर्शनाने पूर्णत्व येईल.