Maghi Ganeshotsav 2019: हिंदू भाविक प्रामुख्याने कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा करतात. मात्र आपल्या परंपरेनुसार, गणपतीचे तीन अवतार आहेत असे मानले जाते. आणि या तिन्ही अवतारांचे जन्मदिवसही वेगवेगळे आहेत. त्यामुळे गणेश भक्त जगाच्या पाठीवर त्यांच्या संस्कृतीनुसार वेगवेगळ्याप्रकारे गणपतीची पूजा अर्चना करतात. माघी गणेशोत्सव (Maghi Ganeshotsav) हा गणेश जयंती म्हणून ओळखला जातो तर भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी (Bhadrapad Ganesh Chaturthi) दिवशी घरगुती गणपतीप्रमाणेच सार्वजनिक स्वरूपातही गणेशोत्सव दहा दिवस मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो. नक्की वाचा: Maghi Ganesh Jayanti 2019: माघी गणेश जयंती 2019 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि
गणपतीचे तीन प्रमुख अवतार?
गणपतीचा पहिला अवतार वैशाख पौर्णिमेचा आहे. हा दिवस पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा अवतार माघ शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच गणेश जयंती म्हणून आपण साजरा करतो. Ganesh Jayanti 2019: गणेश जयंती दिवशी तिलकुंद चतुर्थी विशेष नैवैद्याचे तीळगूळ मोदक कसे बनवाल?
भाद्रपद गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंती वेगवेगळी साजारा का केली जाते?
गणपतीचा अवतार वेगळा असल्याने त्याच्या जन्मदिवसाप्रमाणे सेलिब्रेशन वेगळे असते. पण गणेशलहरी पहिल्यांदा पृथ्वीवर आल्या तो दिवस म्हणजे गणेशजन्म असा समज असणारे गणेश जयंती हाच गणपतीचा जन्मदिवस असं समजून उत्साहात गणेश जयंती साजरी करतात.लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात आणला आणि तो अधिक भव्य दिव्य झाला. सुरूवातीला केवळ कोकणात साजरा केला जाणारा हा सण हळूहळू महाराष्ट्रभर घराघरात पसरला. त्यामुळे भाद्रपद गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते.