Lalbaugcha Raja (Photo Credits: Twitter/ Lalbaugcha Raja)

Lalbaugcha Raja 2019 LIVE Mukh Darshan: जगभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेला गणपती लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) आता भक्तांच्या अधिकच जवळ आला आहे. खास करुन शारीरिक व्याधी असलेले नागरिक, वृद्ध लोक, महिला, व्यवसाय-नोकरी आदींमध्ये व्यग्र असलेली मंडळी तसेच लहान थोर अशा अबाल वृद्धांसाठी लालबागच्या राजाचे मुखदर्शन (Mukh Darshan), आरती (Lalbaugcha Raja Aarti) आणि आरास पाहण्याची थेट संधी उपलब्ध झाली आहे. होय, ही संधी साधण्यासाठी तुम्हाला तुमची जागा सोडून इतरत्र कोठेही जायची गरज नाही. तुम्ही घरबसल्याही लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकता, आरती पाहू शकता आणि भक्तीरसात चिंबही होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्य व्हिडिओवर क्लिक करायचे आहे. या व्हिडिओवर तुम्हाला लालबागच्या राजाचे दर्शन होईल लाईव्ह. आणि हो... यासाठी रांग लावण्याची मुळीच गरज नाही बरं..!

लालबागच्या राजाचे प्रत्यक्ष दर्शन हे एक दिव्यच असते. कारण, लालबागचा राजा गणेश मूर्ती प्रत्यक्ष पाहण्यासाठी लागणारी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागतात. या रांगेत लहान मुले, तरुण-तरुणी, ज्येष्ठ आणि वृद्धांचाही समावेस असतो. काही उत्साही भक्त तर आपल्या लहान बाळांनाही घेऊन येतात. गर्दी इतकी प्रचंड असते की, दर्शनासाठी लागलेली रांग अंतर मोजायचे झाले तर ते काही किलोमीटरमध्ये भरेल. त्यात वरुन कोसळणारा वरुन राजा. एकूणच काय लालबागच्या राज्याला भेटण्यासाठी काहीही, अशी भक्तांची मनस्थिती. एरवी इतकी गर्दी आणि रांग पार करायची म्हणजे अनेकांचा धरकाप उडवणारी स्थिती. पण, लालबागचा राजा गणेश दर्शनासाठी लागलेल्या रांगेत या त्रासाची साधी छाटाही गर्दीच्या चेहऱ्यावर दिसत नाही. अर्थात, गणेशभक्तीत तल्लीन झाल्याने भक्तांना त्यात कोणताही त्रास वाटत नसावा. (हेही वाचा, Ganeshotsav 2019: अष्टविनायक गणपती मंदिर, वैशिष्ट्ये आणि स्थळ; घ्या जाणून)

इथे पाहा लालबाग राजाची आरती लाईव्ह

दरम्यान, लालबागच्या राजावर श्रद्धा आहे. त्याच्या दर्शनाची ओढ आहे. पण, गर्दीत जायची इच्छा नाही. आपल्या मुळे वाहतूक कोंडी होऊ नये. आपण त्या गर्दीचा हिस्सा होऊ नये जो जनजिवन विस्कळीत ठरण्यास कारणीभूत ठरेन. आपल्यामुळे वाढणारी गर्दी पोलीस यंत्रणा, स्थानिक नागरिक, दैनंदिन कामसाठी कार्यालय, व्यवसाय आदि ठिकाणी जाणाऱ्या नेहमीच्या प्रवासी, नागरिकांना त्रास होऊ नये असाव विचार करणारीही अनेस सहृदयी मंडळी आपल्या आसपास पाहायला मिळते. ही मंडळी आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून लालबागच्या राजाच्या दर्शनास जाणे नापसंत करतात. किंबहूना रागंते उभा राहात नाहीत. अथवा लालबागचा राजाच्या दर्शनालाच दात नाहीत. अशा मंडळींसाठी लाईव्ह मुखदर्शन ही एक पर्वणीच असते. त्यामुळे तुम्हीही अशा मंडळींपैकी एक असाल तर घरबसल्या नक्कीच अनुभवा लालबागच्या राजाचे मुखदर्शन. तेही लाईव्ह.