कुंभ मेळा, 2019 (फोटो सौजन्य-ट्विटर)

Kumbh Mela 2019 : प्रयागराज (अलाहाबाद) येथे 15 जानेवारी रोजी कुंभ मेळा, 2019 च्या धार्मिक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी पेक्षा यंदाचा कुंभ मेळ्याचा सोहळा खूप भव्य आणि आकर्षित असणार आहे. त्यामुळे भाविकांसाठी जल मार्ग, वायू मार्ग आणि वाहतूक सेवेची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. तसेच कुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकाला प्रयागराज येथील आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायची असल्यास क्रुजची व्यवस्था करण्यात आली आहे.

भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण म्हणजेच इन्लँड वॉटरेज अथॉरिटी ऑफ इंडियाने प्रयागराज येथे 5 जानेवारी पासूनच मोटरबोट्स आणि क्रुज राईड करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्राधिकरणाची दोन जहाज सीएल कस्तुरबा आणि एसएल कमला सोबत 20 मोटरबोट्स भाविकांसाठी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा -Kumbh Mela 2019 : कुंभमेळ्यासाठी जिओने लाँच केला खास ‘कुंभ जिओफोन’; जाणून घ्या काय आहेत फीचर्स)

प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीवर क्रुजची सुविधा योग्य रितीने होण्यासाठी 4 फ्लोटिंग टर्मिनल्स बनविण्यात आले आहेत. तसेच क्रुज सुविधेबद्दल बोलायचे झाले तर क्रुजसाठी 200 रुपये ते 1200 रुपये प्रति व्यक्ती असे दर भाविकांना मोजावे लागणार आहेत.