Janmashtami 2024 Puja Samagri List: यावर्षी सोमवार, 26 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्णाची जयंती (Shri Krishna's Birth Anniversary) साजरी होणार आहे. कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2024) देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या शुभमुहूर्तावर मंदिरांपासून घरापर्यंत विशेष तयारी केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाची पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याचीही परंपरा आहे. (हेही वाचा - Janmashtami 2024 Quotes In Marathi: श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा शेअर करा कृष्ण मुरारीचे प्रेरणादायी कोट्स)
असे म्हटले जाते की, जन्माष्टमीच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने मुरलीधर कन्हैया भक्तांचे सर्व दुःख आणि संकटे दूर करतात. चला तर मग आता जाणून घेऊया जन्माष्टमीच्या पूजेमध्ये कोणते पूजा साहित्य आवश्यक आहे. (हेही वाचा - Krishna Janmashtami 2024 Dress Ideas For Women: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी राधासारखं दिसण्यासाठी 'या' ड्रेसिंग आयडिया येतील उपयोगी, जाणून घ्या हटके ट्रिक्स)
कृष्ण जन्माष्टमी पूजा साहित्य -
- भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो
- चौरंग, लाल किंवा पिवळे कापड, पूजेचे ताट
- कापूस, दिवा, तेल, अगरबत्ती, धूप
- झेंडूची फुले, तुळशीची पाने, केळीची पाने, सुपारी, गुलाबाची फुले
- मिठाई (लाडू, पेडा), फळे, दही, लोणी, पाच मेवा, दही, पंजिरी.
- पंचामृत (दही, दूध, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण)
- गंगाजल, अत्तराची बाटली, चंदन, कुंकुम आणि शुद्ध पाणी.
- बाळ गोपाळांसाठी मेकअपच्या वस्तू (बासरी, कानातले, पगडी, हार, टिळक, पायल किंवा कमरबंद, काजल, मोराची पिसे)
- कान्हाजी साठी झुला आणि मोरपंख
जन्माष्टमी पूजेचे महत्व -
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या जोडप्यांना मूल होत नाही त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी बाळ गोपाळाची पूजा केल्याने संतती प्राप्ती होते, असं म्हटलं जातं. जन्माष्टमीचे व्रत केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि संपत्तीतही वाढ होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. त्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. लेटेस्टली मराठी यातील एकाही गोष्टीच्या सत्यतेचा पुरावा देत नाही.)