Kojagiri Purnima Marathi Messages: अश्विन महिन्यातील पौर्णिमा 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. या दिवशी केशरयुक्त दूधात चंद्राचे प्रतिबिंब पाहुन त्याचा आस्वाद घेतला जातो. म्हणून यास 'कौमुदी पौर्णिमा' असेही म्हणतात. कौमुदी म्हणजे चंद्राचे चांदणे. यंदा मंगळवार, 19 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लोक एकत्र जमून केशरयुक्त दुधाचा आस्वाद घेता. हा छोटेखानी कार्यक्रम मोकळ्या अंगणात किंवा सोसायटीच्या गच्चीत केला जातो. सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) वरुन कोजागिरी पौर्णिमेचे मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images शेअर करुन शरद पौर्णिमेची रात्र साजरी करता येईल.
आषाढ, श्रावण, भाद्रपद हे तीन महिने पावसाचे असतात. त्यामुळे चंद्राचे लोभस रुप, टिपुरं चांदणं याचा अनुभव घेता येत नाही. आश्विन महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्याने आकाश निरभ्र असते. त्यामुळे चंद्राच्या विलोभनीय रुपाचे दर्शन घेता येते. तसंच या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये अमृतमय गुण असतात असे मानले जाते. त्यामुळे चंद्राच्या शीतल प्रकाशात ठेवलेल्या दूधाचे सेवन आरोग्यासाठी उत्तम समजलं जातं. यामुळेच केशरयुक्त दुधात चंद्राचं प्रतिबिंब पाहून ते सेवन करण्याची प्रथा पडली असावी. (Kojagiri Purnima Masala Doodh Recipe: कोजागिरीच्या रात्री 'कोजागिरी स्पेशल मसाला दूध' बनवण्यासाठी जाणून घ्या सोपी रेसेपी)
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश:
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी
आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो!
कोजागिरी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते
दूधात देखणे रूप चंद्राचे दिसते
शरद पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
प्रकाश चंद्राचा, आस्वाद मसाले दुधाचा
आनंदाने साजरा करु, सण कोजागिरीचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
मंद प्रकाश चंद्राचा
त्यात गोड स्वाद दुधाचा
विश्वास वाढू द्या नात्यांचा
त्यात गोडवा असू दे साखरेचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात, करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण,
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जो जागा आहे, जागृत आहे त्याला लक्ष्मी देवी प्रसन्न होते, असे मानले जाते. जाणं असणं म्हणजे स्वतःच्या कामाप्रती दक्ष असणं. स्वतःचा विकास करण्यासाठी जागरुक, सजग असणं. अशा व्यक्तींवर लक्ष्मी देवी नक्कीच प्रसन्न होईल. हा अर्थ उमजून यंदाची कोजागिरी पौर्णिमा आपल्या प्रियजनांसोबत साजरी करा. तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!