
Tukaram Beej 2024 Date: ‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’, असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून सदेह वैकुंठागमन केलं तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही पाळला जातो. यंदा तुकाराम बीज 27 मार्च 2024 रोजी पाळला केला जाईल. तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जुन भेट देतात. 27 मार्च रोजी संत तुकाराम बीजोत्सव पाळला म्हणून जात आहे, ज्याला तुकाराम बीज म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की, ते हिंदू कॅलेंडरमधील चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी वैकुंठाला गेले होते, म्हणून या दिवसाला तुकाराम बीज म्हणतात. संत तुकाराम महाराज भले संसारी असतील, पण त्यांनी परमार्थाचा मार्ग स्वीकारला. ते सतराव्या शतकातील वारकरी संत आणि कवी होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी झाला. पंढरपूरची विठू माऊली हे तुकारामांचे कुलदैवत होते.
पंढरपूरचे विठ्ठू माऊली हे हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु ' म्हणून ओळखतात. तुकाराम बीजच्या दिवशी तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात आसमंत भरून निघतो आणि त्या दिवशी देवळाच्या आवारातलं एक पिंपळाच झाड थरारतं असं सांगितलं जातं. जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी रचले आणि यातून जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला.
सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.