Kisan Diwas 2020 Wishes: भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंह यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 23 डिसेबंर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह भारताचे पाचवे पंतप्रधान होते. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. हा कार्यकाळ अगदी अल्प असला त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना तयार केल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळायला हवा आणि त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्यांचे महत्त्व अपार आहे. त्यामुळे यंदाच्या राष्ट्रीय शेतकरी दिनानिमत्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करु शकता.
शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठकणा असल्याने त्यांच्यासाठी एक समर्पित दिवस असावा या उद्देशाने चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह हे राजनेता असण्यासोबतच एक चांगले लेखक देखील होते. त्यांची इंग्रजी भाषेवर चांगली पकड होती. त्यांनी एबॉलिशन ऑफ जमींदारी, इंडियाज पॉवर्टी एंड इट्ज सॉल्यूशंस आणि लीजेंड प्रोपराइटरशिप यांसारखी पुस्तके लिहिली आहेत. (Kisan Diwas 2020 Messages: किसान दिवस निमित्त बळीराजाबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, Wishes)
किसान दिवसाच्या शुभेच्छा!
रानात दिनभर राबतो
तोच आहे खरा राजा,
रानात सोनं पिकवतो
शेतकरी माझा...
राष्ट्रीय किसान दिनाच्या शुभेच्छा!

मातीतून सोने पिकवणाऱ्या बळीराजाला
राष्ट्रीय किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

घाम गाळून पिकवलेलं कवडीमोलानं विकलं
भागवून भूक जगाची त्यानं मायेचं ऋण फेडलं
सर्व शेतकरी बांधवांना
राष्ट्रीय किसान दिनाच्या शुभेच्छा!

स्वत:च्या रक्ताचं पाणी करुन
संपूर्ण जगाच्या भूकेसाठी राबणाऱ्या
जगाच्या पोशिंद्याला
राष्ट्रीय किसान दिनानिमित्त शतश: नमन!

अस्मानी, सुलतानी संकटांना तोंड देत
धीराने उभ्या असलेल्या
माझ्या बळीराजाला
राष्ट्रीय किसान दिनाच्या खूप शुभेच्छा!

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणावर छेडलं आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे या समस्येवर नुसत्या चर्चा करुन भागणार नाही. तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस पाऊलं उचलणं गरजेचं आहे.