Happy Karwa Chauth Wishes For Husband: उत्तर भारतामध्ये अश्विन कृष्ण चतुर्थीचा दिवस हा सवाष्ण महिला करवा चौथ (Karva Chauth) म्हणून पाळतात. पती दीर्घायुष्यासाठी करवा चौथ दिवशी महिला निर्जळी उपवास करतात. यंदा हा करवा चौथ आज 13 ऑक्टोबर दिवशी आहे. विवाहीत स्त्रियांप्रमाणेच अविवाहीत तरूणी देखील इच्छित वर मिळावा या अपेक्षेने करवा चौथसाठी उपावास ठेवून प्रार्थना करतात. मग महिलावर्गासाठी इतक्या महत्त्वाच्या असणार्या दिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूकच्या (Facebook) माध्यमातून शेअर करून करवा चौथच्या शुभेच्छा ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Images, मेसेजेसच्या माध्यमातून शेअर करून नक्की द्या. आजच्या दिवशी सार्या महिला एकत्र येऊन करवा चौथचा आनंद साजरा करतात. नक्की वाचा: Bollywood Karva Chauth 2022: यावर्षी Alia Bhatt आणि Katrina Kaif सह 'या' लोकप्रिय अभिनेत्री साजरा करणार आपला पहिला करवा चौथ.
करवा चौथ च्या निमित्ताने महिला सारा साज श्रृंगार करून तयार होतात. चंद्रदर्शन झाल्यानंतर विधिवत पूजा करून चाळणीतून चंद्र आणि पतीचा चेहरा पाहतात. या सोपस्कारांनंतर पती आपल्या पत्नीला अन्नाचा घास आणि पाणी देऊन तिच्या उपवासाची सांगता करतो. यावेळेस पती आपल्या पत्नी एखादी भेट देखील देतो.
करवा चौथच्या शुभेच्छा
चंद्र दर्शनानंतर करवा चौथची सांगता होत असल्याने देशात विविध ठिकाणी चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असल्याने हा विधी वेगवेगळ्या वेळेत होऊ शकतो पण सामान्यपणे आज देशात रात्री 8.30 नंतर करवा चौथचा उपवास सोडला जाणार आहे.