
Kartik Maas 2020: आजपासून कार्तिक महिना सुरू झाला आहे. हा महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णू व्यतिरिक्त लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या महिन्यात उपवास आणि तपस्येला खूप महत्व आहे. कार्तिक महिन्यात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे योग्य पालन करणाऱ्याला सुख, समाधान आणि धनसंपत्तीची प्राप्ती होते. हा चातुर्मासचा शेवटचा महिना आहे. या महिन्यात, देवाच्या उपासनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महिन्यात कोणत्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे समजून घेऊयात. दिवाळीचा सण या महिन्यात येतो. या महिन्यात दररोज देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतात. या महिन्यातील प्रत्येक रात्री आपण भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची एकत्र उपासना करावी. याशिवाय तुम्ही जर गुलाबी किंवा चमकदार कपडे परिधान करून पूजा केली त्याचा परिणाम अधिक चांगला होता. (हेही वाचा - World Vegan Day 2020: Vegetarianism आणि Veganism मध्ये नेमका फरक काय?)
कार्तिक महिन्यात 'या' नियमांचे पालन करा -
- या महिन्यात तुळशीच्या रोपाची पूजा केली पाहिजे. यामुळे उपासनेचे महत्त्व दुप्पट होते.
- जर आपण या महिन्यात जमिनीवर झोपलात तर तुमच्या मनात अत्यंत पवित्र विचार येतात, असं म्हटलं जातं. कार्तिक महिन्यातील तिसरे मुख्य काम जमिनीवर झोपण्याचे समजले जाते.
- या महिन्यात प्रत्येक दाम्पत्याने ब्रह्मचर्य पाळावे. जर असे केले नाही, तर नवरा-बायकोला दोष लागतात, अशी अख्यायिका आहे.
- या महिन्यात दीपदानाला अतिशय महत्त्व आहे. या महिन्यात दीपदान करायला हवे. यामुळे पुण्यप्राप्ती होते. दीपदान नदी, तलाव इत्यादी ठिकाणी केले जाते.
याच महिन्यात विष्णू झोपेतून उठतात. या दरम्यान, पृथ्वीवर आनंद आणि कृपाचा पाऊस होतो. तसेच असे मानले जाते की, या महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरते. त्यामुळे लक्ष्मी माता भक्तांवर संपत्तीची कृपा करते. या महिन्यात देवी लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात धन त्रयोदशी, दीपावली आणि गोपाष्टमी देखील साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, या महिन्यात लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूची पूजा केल्यास त्या व्यक्तीला धनलाभ होतो.
टीप- या लेखातील कोणतीही माहिती / सामग्री / अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी देत नाही. ही माहिती आपल्याला विविध माध्यमांद्वारे / ज्योतिषी / पंचांग / प्रवचने / विश्वास / शास्त्रवचनांच्या आधारे देण्यात आलेली आहे. आमचा हेतू फक्त माहिती पोहोचविणे आहे. त्यामुळे वाचकांनी यास केवळ माहिती म्हणून विचारात घ्यावे.