
थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Phule) म्हणजे परीवर्तानाची धगधगती मशाल. महात्मा फुले यांचे विचार आणि कृती आजही अनेकांना प्रेरणा देते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेले काम हे इतिहासांच्या पानावर नेहमीच अतुलनीय ठरले आहे. त्यांनी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यासोबतच त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यातील विचार आजही प्रेरणादाई आहेत. 'शेतकऱ्याचा आसूड' आणि 'गुलामगिरी' या ग्रंथामुळे समाजपरीर्तनास मोठी चालना मिळाली. 11 एप्रिल या दिवशी ज्योतिबा फुले यांची जयंती (Mahatma Jyotiba Phule Jayanti 2021) . ज्योतिबांच्या जयंतीनिमित्त आज पुन्हा एकदा त्यांचे हे विचार ( Mahatma Phule Quotes) अनेकांना विचार करण्यास प्रवृत्त करतील.
महात्मा फुले यांचे विचार





महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1927 रोजी झाला. तर 28 नोव्हेंबर 1890 मध्ये त्यांचे निधन झाले. ज्योतिबा फुले यांनी लहानपणापासूनच गरिबी, विषमता, जातियता पाहिली होती. त्यातून त्यांना अन्याय, अत्याचाराविरुद्ध चिड निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी अस्पृश्यता दूर करण्याचा निश्चय केला. त्यासाठी सर्वसामान्य जनता आणि तळागाळातील शेवटचा माणून डोळ्यासमोर ठेऊन कार्याला प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे कार्य पाहून समाजाने त्यांना महात्मा ही पदवी दिली.महाराष्ट्रावर ज्या तीन मोठ्या समाजसुधारकांचा पगडा आहे त्यात महात्मा फुले यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील वैचारिक परंपरांना महात्मा फुले यांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा उल्लेख करताना 'फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र' असा शब्दप्रयोग पाहायला मिळतो.