
इंडो-तिबेटीयनच्या सीमारेषीवरील (Indo-Tibetan Border) पोलिसांचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारताचे जवान योगाभ्यास करताना दिसून येत आहे. व्हिडिओत दिसणारा हा योगाभ्यास जमिनीपासून तब्बल 18 हजार किमी उंचीवर असणाऱ्या लदाख़ येथे करण्यात येत आहे. येत्या 21 जून रोजी 'जागतिक योग दिन साजरा' (International Yoga Day) करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर भारतीय जवान योगा करताना दिसून येत आहे.
व्हिडओतील जवानांमध्ये योगा करण्याचा उत्साह दिसून येत आहेत. तसेच विवध प्रकारचे योगासने जवानांकडून करण्यात येत आहेत. परंतु लद्दाख़च्या 18 हजार किमी उंचीवर बर्फाळ ठिकाणीसुद्धा जवानांनी केलेल्या योगाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
('इथे' अंडं फोडायला लागतो हातोडा, भारतीय सैनिकाने शेअर केला व्हिडीओ Watch Video)
बर्फाळ ठिकाणी योगा करणे थोडे कठीणच आहे. मात्र जवानांनी अशा परिस्थितीत सुद्धा योगा करत असल्याचा आनंद त्यांच्याकडे पाहून दिसून येत आहे. तर गेल्या वर्षीसुद्धा जवानांनी योगा दिना निमित्त लद्दाख़ येथे आईटीबीपीच्या जवानांनी योगासने केली होती.