Soldier Using Hammer To Break Eggs in Siachen (Photo Credits: IANS)

देशभरात तापमानाचा ज्वर दिवसागणिक वाढत असताना देशातील सर्वात उंचीवरच्या युद्ध मैदानात उष्णतेचा मागमूस देखील उरला नाहीये. सियाचीन (Siachen) मध्ये आता तापमान अक्षरशः शुन्याहूनही कमी झालं असल्याने तिथे राहणाऱ्या सैनिकांचे अतोनात हाल होत आहेत. अलीकडेच सियाचीन मध्ये स्थित सैनिकाने सोशल मीडियावर हातोड्याने अंडं फोडत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावरून थंडीच्या माऱ्याने नाजूक अंडं देखील इतकं गोठून गेलंय त्यावरूनच तिथल्या हवामानाचा अंदाज आपण घेऊ शकता. येत्या दिवसात हे तापमान शून्यपेक्षा देखील कमी होऊन मायनस 40 ते 70 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या या व्हिडिओमध्ये तीन सैनिक सुरवातीला ज्यूसचे टेट्रा पॅक उघडण्यासाठी हातोडा वापरताना दिसत आहेत हे पॅक उघडल्यावर मात्र त्यात केवळ बर्फ साचलेला दिसून येतो. त्यानंतर तर चक्क अंडं फोडण्यासाठी देखील त्यांना हातोडा वापरायला लागतो. सियाचीन मध्ये तापमान इतके कमी आहे ज्यूस किंवा तत्सम गोष्टी पिण्यासाठी त्या उकळून प्यावा लागतात अन्यथा त्यात केवळ बर्फ उरलेला असतो, असे सैनिकांनी व्हिडीओ मध्ये म्हंटले आहे. कारच्या बोनेटला लटकलेल्या पीडित व्यक्तीसह कारचालकाचा 2 किलोमीटरचा प्रवास (Viral Video)

(Watch Viral Video)

आता अंडं फोडायला हातोडा लागतो यावरून जरी कुतुहूल वाटत असलं तरी हा व्हायरल व्हिडीओ सियाचीनमधील जवानांच्या कठोर जीवनाचा प्रत्यय देऊन जातो.या व्हिडीओ वरून सामान्य नागरिकांनी इतक्या कठीण परिस्थितीत देशासाठी काम करणाऱ्या सैनिकांचे कौतुक केले आहे.तसेच सैनिकांच्या आयुष्यावर टिपण्णी करणाऱ्यांनी अशा परिस्थितीत राहून दाखवावे असे आवाहन देखील काहींनी केले आहे.