
International Labour Day 2024 Quotes : आंतरराष्ट्रीय कामगार दिन, ज्याला कामगार दिन किंवा मे दिवस म्हणून देखील ओळखले जाते, दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा जगभरातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जाणारा जागतिक दिवस आहे. हा दिवस आपल्याला कामगार चळवळ आणि कामगार वर्गाच्या संघर्षाची आणि उपलब्धींची आठवण करून देतो. अनेक देशांमध्ये यानिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. दरम्यान, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये कामगार दिन सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो. कामगारांना अवेळी आणि अमर्यादित कामामुळे 1 मे 1886 ला युनायटेड स्टेट्समधील कामगार संघटनांनी कामगारांना दिवसातून आठ तास काम करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी संप सुरू केला. त्यांना त्यांच्या कामाचे तास 15 तासांवरून 8 तासांवर आणायचे होते. 4 मे रोजी, जगभरातील संपादरम्यान, शिकागोच्या हेमार्केटमध्ये एकापाठोपाठ एक अनेक बॉम्बस्फोट झाले, ज्यात पोलीस अधिकारी, नागरिक तसेच कामगार मारले गेले. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये आठ तास कामाचे नियम बनवले गेले. 1889 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या सभेत रेमंड लॅव्हिग्ने एक ठराव मंजूर केला आणि 1 मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 1891 मध्ये, काँग्रेसने अधिकृतपणे कामगार दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. दरम्यान, तुम्ही अप्रतिम खास शुभेच्छा, व्हॉट्सॲप मेसेज, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्सद्वारे कामगार दिनाच्या शुभेच्छा प्रियजनांना देऊ शकता.
पाहा खास शुभेच्छा संदेश:





गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर तीन वर्षांनी 1889 मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेची बैठक झाली, ज्यामध्ये कामगारांच्या कामाचे तास 8 तासांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेनंतर १ मे रोजी कामगार दिन साजरा करण्यात आला आणि दरवर्षी या दिवशी कामगारांना सुटी देण्याचा निर्णयही घेण्यात आला.