Indian Billionaire Bought a Car Worth Rs 22 Crore: भारतीय अब्जाधीश अनेकदा त्यांच्या अफाट जीवनशैलीमुळे चर्चेत असतात. ज्यात लक्झरी कार, आलिशान इस्टेट आणि प्रायव्हेट जेटचा समावेश असतो. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी, अनिल अग्रवाल, राधाकिशन दमानी आणि अदार पूनावाला ही नावे त्यांच्या प्रभावशाली संपत्ती आणि ऐश्वर्यामुळे चर्चेत आहेत. नुकतीच तब्बल २२ कोटी रुपये किमतीची कस्टम बिल्ट रोल्स रॉयस कार विकत घेऊन पूनावाला यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चला तर मग पाहूया, योहान पूनावाला यांच्या आलिशान जीवनशैलीबद्दल..योहान पूनावाला यांनी नुकतीच रोल्स रॉयस फँटम आठवी ईडब्ल्यूबी (एक्सटेंडेड व्हीलबेस) २२ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये ही नवीन भर केवळ आणखी एक लक्झरी वाहन नाही, तर एक मास्टरपीस आहे.
योहान पूनावाला च्या रोल्स रॉयस फँटमचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे एक्सक्लुझिव्ह प्रायव्हसी सूटचा समावेश. रोल्स रॉयसने यापूर्वी बंद केलेले हे फीचर अब्जाधीशांच्या विनंतीवरून पुन्हा सुरू करण्यात आले.
योहान पूनावाला यांची आलिशान जीवनशैली कारच्या पलीकडे पसरली आहे. पत्नी मिशेल पूनावाला यांच्यासोबत त्यांनी नुकताच दक्षिण मुंबईत ३० हजार चौरस फुटांची हवेली विकत घेऊन आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. ४०० ते ७५० कोटी रुपये किमतीची ही हवेली आहे.