भगवान हनुमान (फोटो सौजन्य- फेसबुक)

कितीही कष्ट करून हाता तोंडाशी आलेलं सुख थोडक्यात तुमच्यापासून दुरावतय का?  शारीरिक आणि मानसिक तणावामुळे तुम्हाला सुन्न झाल्यासारखं वाटतंय का? अनेकदा मन शांत नसल्यास कामात लक्ष लागत नाही परिणामी यशाच्या आणि आपल्यामध्ये मोठं अंतर निर्माण होत. कोणत्याही कामात सफल होण्यासाठी मनाची एकाग्रता महत्वाची असते यासाठी आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये पारायण, ध्यान, असे अनेक मार्ग सुचवण्यात आले आहेत.

या सोबतच ठराविक दिवशी ठराविक देवतेचं पूजन केल्यास लाभ होतो असंही सांगण्यात आलं आहे. त्यानुसार मंगळवारच्या दिवशी पवनपुत्र हनुमानाची आराधना केल्यास मानसिक शांती आणि शक्तीची प्राप्ती होते असे मानले जाते. Hanuman Jayanti 2019: शक्तीची देवता 'हनुमान' विषयी जाणून घ्या 7 खास गोष्टी

 

मंगळवारच्या शुभ दिवशी हनुमानाची पूजा करताना या पाच कृतींचा आधार घेतल्यास फायदा होत असल्याचं सांगण्यात येते,हे पाच मार्ग कोणते हे जाणून घ्या:

1) मंगळवारी पिंपळाची ११ पाने गोळा करून त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. या पानांवर हाताच्या बोटाने कुंकवाच्या अक्षरात राम असे लिहून ही पाने मारुतीच्या मंदिरात वाहावीत यामुळे दुःखापासून मुक्ती होऊ शकते.

2)मारुतीरायाची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी हनुमानाला बनारसी पान अर्पण करावे.

3)बजरंगबली सोबतच ६४ कलांचा अधिपती गणपतीला,लाल रंगाचे वस्त्र, लाल रंगाची मिठाई व लाल रंगाच्या फळाचा नैवैद्य द्यावा.

4) आजच्या दिवशी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी तांबे,सोने, कस्तुरी, लाल गुलाब, गहू, कुंकू इत्यादींचे दान करावे. यामुळे शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते असे मानण्यात येते.

5) शनी देवतेच्या रोषापासून मुक्त व्हायचे असल्यास काळ्या उडदाची डाळ व कोळसा एका कापडात बांधून त्यामध्ये एक रुपयांचे नाणे ठेवावे.

या सोबतच हनुमानाची पूजा करत असताना मनात निस्वार्थी भाव असणे आवश्यक आहे, हनुमानाला अनेकदा शक्तीची देवता म्हणून संबोधलं जात असलं तरीही त्याचा भोळा स्वभाव हा भक्तांनीही बाळगायला हवा.

टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.