One Eye Calf (Photo Credits : Twitter)

पश्चिम बंगाल येथे एका गाईने एक डोळा असणाऱ्या तिच्या बाळाला जन्म दिला आहे. परंतु या वासरुची चर्चा जगभर वाऱ्यासारखी पसरत चालली आहे. खरंतर या वासरुला एकच डोळा असून त्याचा चेहरासुद्धा इतर गाईंच्या बाळांच्या तुलनेपेक्षा वेगळा आहे. रिपोर्ट्सच्या अनुसार, पश्चिम बंगालच्या बर्धमान (Bardhaman) जिल्ह्यातील ही घटना आहे. तर येथील स्थानिक लोक या वासरुला देवाचे रुप मानून पूजा करत आहेत. तसेच पूजा करण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक दररोज मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

गाय असणाऱ्या मालकाचे असे म्हणणे आहे की, या गाईने वासरुला जन्म दिल्याच्या दिवसापासून त्याच्या दर्शनासाठी रांग लागत आहे. लोक या वासरुला देवाचा चमत्कार म्हणून त्याची पूजा करु लागले आहेत. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, हे वासरु 'साइक्लोपिया' (Cyclopia) च्या आधारे जन्मले आहे. जो एक दुर्लभ आजार आहे. या आजाराची लागण प्राणी किंवा व्यक्तींनासुद्धा होऊ शकते. तर या आजारपणामुळे गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाचे डोळे किंवा तोंडाचा काही भाग पूर्णपणे तयार होत नाही.

या स्थितीत बाळाला श्वासनाचे आणि मेंदूशी निगडित असणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच या स्थितीतील बाळ जास्त काळ जगण्याची शक्यता कमी असते.