Viral Video: गायसह तिच्या वासराला पाणी पुरी खाऊ घालत असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल
गायसह वासरु खातेय पाणीपुरी (Photo Credits: Insta)

Viral Video:  पाणीपुरी खाण्याचा मोह कोणाला आवरणार नाही. अशातच आता गायसह तिच्या वासराला पाणी पुरी खाऊ घालत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्या व्यक्तीने सर्वांचे मन जिंकले आहे. बहुतांश लोक शिल्लक किंवा शिळे अन्नपदार्थ जनावरांना खायला घालतात. मात्र असे पदार्थ खाल्ल्याने त्यांच्या पोट बिघडते. मात्र गायला पाणी पुरी देण्याचा व्यक्तीने घेतलेला निर्णय पाहता त्याचे कौतुक केले जात आहेच. पण गाय आणि तिचे वासरु सुद्धा आनंदाने पाणी पुरी खाताना दिसून आले.

व्हिडिओत असे दिसून येत आहे की, एक व्यक्ती आपल्या हातांनी गाय आणि तिच्या वासराला पाणी पुरी खायला देत आहे. मनाला समाधान देणारा हा व्हिडिओ लोकांच्या खुप पसंदीस पडला आहे. सध्याच्या काळात पशूंवर केल्या जाणाऱ्या अत्याचाऱ्याच्या पार्श्वभुमीवरच हा व्हिडिओ समोर आल्याने एक आशा निर्माण झाली आहे. Sree13020 नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने आपल्या इंन्स्टाग्रामवरील अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.(कर्करोगाने मरण पावलेल्या माहूताला निरोप देतानाचा हत्तीचा हृदयद्रावक व्हिडीओ पाहून तुम्हालाही अश्रु आवरणार नाहीत  Watch Viral Video)

Viral Video:

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by sree130920 (@sree130920)

व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो खुप जणांनी लाइक्स केला आहे. जानवरांच्या प्रति प्रेम या व्हिडिओमधून दिसून येत असल्याचे व्यक्तीचे सुद्धा कौतुक होत आहे. एका युजर्सने म्हटले की, मोठे दृदय असणारे काका. हा व्हिडिओ आतापर्यंत 62 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.