Cow following calf | (Photo Credits: YouTube/OmmcomNews)

सोशल मीडियावर नेहमी नवनवीन व्हिडिओ व्हायरल होताना पाहिले आहेत. मात्र, ओडिशाच्या (Odisha) मलकनगिरी (Malkangiri) शहरातील एका गायीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, जो पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी येईल. या व्हिडिओतील गायीचे वासराला रस्त्यातून जात असताना एका वाहनाने धडक दिली. यामुळे स्थानिक लोक या वासराला हातगाडीवरून पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, त्या वासराला घेऊन जात असताना त्याची आई म्हणजेच ती गाय हातगाडीच्या मागे धावताना दिसत आहे. दरम्यान, एका व्यक्तीने हा व्हिडिओ काढला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

या व्हिडिओत जखमी वासराला वैद्यकीय दवाखान्यात घेऊन जात आहे. या व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला वासरासह त्याच्या आईचीही दया येईल. या व्हिडिओतील गाय आपल्या वासरासाठी चिंतीत आहे. वासराला झालेली जखम पाहून त्या गायीलाही त्याच्या वेदना सहन होत नाहीत. दोन व्यक्ती हातगाडीवरून या वासराला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, या वासाराची आईदेखील त्यांच्या मागे धावताना दिसत आहे. हे देखील वाचा- Gujarat: धक्कादायक! लग्नात गरबा खेळताना अचानक कोसळली; महिलेचा अवघ्या 17 सेकंदात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)

युट्यूब व्हिडिओ-

दरम्यान, स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वेगवान वाहनाच्या मध्यभागी आल्याने वासरु जखमी झाले आहेत. त्यानंतर लोकांनी याबाबत जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात माहिती दिली. तसेच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.