कर्करोगाने मरण पावलेल्या माहूताला निरोप देतानाचा हत्तीचा हृदयद्रावक व्हिडीओ पाहून तुम्हालाही अश्रु आवरणार नाहीत ( Watch Viral Video )               
Photo Credit: Facebook

सोशल मिडीयावर हल्ली आपण हत्तीचे ( Elephant Video) अनेक व्हिडिओ पाहत असतो. त्याच्या सोंडेने करामती करतानाचा व्हिडिओ, पाण्यात खेळतानाचा व्हिडिओ असे बरेच व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर उपलब्ध आहेत. नेटकऱ्यांचा  ही अशा व्हिडिओला भरपूर प्रतिसाद ही मिळतो.सध्या सोशल मीडियावर असाच एक भावुक करणारा हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.आपल्या लाडक्या मालकाचे माहूताचे निधन झाल्यानंतर त्याला अखेरचा निरोप देणाऱ्या हत्तीचा हृदयवर्धक व्हिडिओ समोर आला आहे. कर्करोगाशी झुंजताना प्राण गमावलेल्या माहूताच्या पार्थिवासमोर हत्तीने सोंडेने मानवंदना दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (प्लास्टीकचा डबा तोंड अडकलेल्या कुत्र्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी शिताफीने केली सुटका; पहा पुण्यातील घटनेचा वायरल व्हिडीओ )

केरळमधील कोट्टायममध्ये (Kottayam) ही मन हेलावून टाकणारी घडना घडली. कुण्णक्कड दामोदरन नायर (Kunnakkad Damodaran Nair) यांना प्रेमाने ओमानचेत्तन (Omanachettan) म्हटलं जात असे. हत्तींवर ते लेकरांप्रमाणे प्रेम करत असत. जवळपास सहा दशकांपासून ते विविध हत्तींचा सांभाळ करत होते. 3 जून रोजी ओमानचेत्तन यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरशी लढताना वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

व्हिडीओमध्ये माहूताच्या पार्थिवासमोर सोंड उंचावून हत्तीने अखेरचा सलाम केले ला दिसत आहे . त्यानंतर तो अक्षरशः नतमस्तक झाला. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या हृदयातही धस्स झाल. तिथे उपस्थित असलेल्या एकाने हा व्हिडिओ शूट केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ बघून हळहळ व्यक्त केली आहे.