Pune Dog | Screengrab of the video - Facbook/ nilesh.mahajan.1088

प्लास्टिक हा आपल्यासाठी वरकरणी पाहता खूप सोयीचा पर्याय वाटत असला तरीही तो पर्यावरणाला पुरक नसल्याने अनेक समस्यांना कारणीभूत देखील ठरत आहे. त्यामुळे त्याची विल्हेवाट कशी लावायची आणि वापर कसा करायचा हा विचार देखील सजगकतेने करण्याची वेळ आली आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू, डब्बे असेच निसर्गात टाकून दिल्याने त्याचा फटका प्राण्यांनाही ओत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यापैकीच एक पुण्यातील घटना ताजी आहे. समुद्रामध्ये प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये अडकून तडफडणार्‍या माशाला एका स्कुबा डायवरने दिले जीवनदान; पहा हा हृद्यस्पर्शी व्हिडीओ (Watch Viral Video).

पुण्यात मार्केटयार्ड परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एका कुत्र्याचं प्लॅस्टिकच्या डब्ब्यात तोंड अडकून तो तळमळत सैरभैर फिरत होता. दरम्यान सुदैवाने या घटनेची बाब पुण्याच्या अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यांनी या भटक्या कुत्र्याला जाळीत अडकवून मोठ्या शिताफीने प्लॅस्टिकच्या डब्यातून मोकळे केले. सध्या या भटक्या कुत्र्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्येही वायरल होत आहे.

प्लॅस्टिकच्या डब्यात तोंड अडकलेला भटका कुत्रा

दरम्यान भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सध्या सगळीकडेच आहे. लॉकडाऊन आणि कडक संचारबंदी असल्याने अनेकदा या भटक्या कुत्र्यांना खायला काहीच मिळत नाही. मग अन्नाच्या शोधात इथे तिथे फिरणार्‍या कुत्र्यांसोबत अशा दुर्देवी घटना घडतात. अनेकदा लोकं भटक्या कुत्र्यांकडे फारसं लक्ष देत नसल्याने त्यांची स्थिती फारच दयनीय असते.