Tips to Remove Holi Colours: आज संपूर्ण देशभरात होळीचा (Holi) सण साजरा केला जाते आहे. प्रत्येकजण एकमेकांना रंग किंवा गुलाल लावून रंगोत्सव (Festival of Colors) साजरा करत असतो. होळीनिमित्त बाजार बहुतेक रासायनिक रंग विकले जातात. या रंगांनी होळी खेळल्यास त्वचा आणि केसांचे नुकसान होते. बर्याच वेळा होळीचे हे रंग इतके हट्टी असतात की, बरेच प्रयत्न करूनही केस आणि त्वचेवरील रंग निघत नाहीत. हर्बल आणि नैसर्गिक रंगांनी होळी खेळणे सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. परंतु जर आपण रासायनिक समृद्ध रंगांनी होळी खेळत असाल, तर हे रंग घालवणे आपल्यासाठी एक प्रकारचे आव्हान आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी केसांमधील आणि त्वचेवरील होळीचा रंग काढून टाकण्यासंदर्भात (Tips to Remove Holi Colors) काही प्रभावी आणि आणि सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत. (Holi 2021: भारतात 'या' ठिकाणी लोक होळी खेळत नाहीत; त्यामागील रहस्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का)
त्वचेवरील होळीचा रंग कसा काढायचा?
खोबरेल तेल -
खोबरेल तेल म्हणजेच नारळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही त्वचेवरील होळीचे रंग काढून टाकू शकता. रंगांनी होळी खेळण्यापूर्वी तुमच्या शरीरावर नारळ तेल लावा. याशिवाय, होळी खेळण्यापूर्वी आपण आपल्या हातांना, चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर मॉश्चरायझर लावू शकता.
डार्क नेल पेंट -
आपण डार्क नेल पेंटने तुमची नखे रंगवू शकता. यामुळे होळी खेळताना तुमच्या नखांवर डाग पडणार नाहीत.
कोमट पाणी -
होळीचे हट्टी रंग त्वचेवरून काढून टाकण्यासाठी पहिल्यांदा आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.
फेस पॅक -
आपण ओटमील फेस पॅक सह DIY करू शकता. तीन चमचे ओटचे पीठ घेऊन त्यात लिंबाचा रस आणि दोन चमचे मध घालून पाणी घाला आणि मिश्रण तयार करा. आता फेसपॅक त्वचेवर लावा आणि त्वचेवर हळूवारपणे मालिश करा. त्यानंतर 40 मिनिटे हा फेसपॅक असाचं लावून ठेवा. यानंतर आपला चेहरा कोमट किंवा सामान्य पाण्याने धुवा.
केसांमधून होळीचे रंग कसे काढावेत?
खोबरेल तेल -
होळी खेळण्यापूर्वी केसांमधील रंग सहजपणे काढून टाकण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपल्या केसांना नारळ तेल लावणे. खरं तर, तेल केसांवर एक संरक्षक थर बनवते, ज्यामुळे होळी खेळल्यानंतर केसांमधून रंग घालवणे सुलभ होते.
अंड्यातील पिवळा बलक किंवा दही -
होळी खेळल्यानंतर लगेचच केस धुण्यास टाळा. यापूर्वी आपण आपल्या केसांवर अंड्यातील पिवळ बलक किंवा दही लावू शकता. हे लावल्यानंतर थोड्यावेळासाठी असंच ठेवा. नंतर केस धुवा. यामुळे केसातील रंग घालवणे अधिक सोप होईल.
शैम्पू -
होळी खेळल्यानंतर, आपण शैम्पूने केस धुवू शकता. तथापि, केस धुताना ओल्या केसांवर शैम्पू लावा. केस धुतल्यानंतर त्यावर कंडिशनर आणि एक चांगले सीरम लावण्यास विसरू नका.
व्हिडिओ पहा-
महत्त्वाचे म्हणजे या लेखात नमूद केलेल्या सोप्या आणि प्रभावी पध्दतींचा उपयोग करून आपण आपली त्वचा आणि केसांमधून होळीचे रंग काढून टाकू शकता. मात्र, पावडरयुक्त रंग काढून टाकण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका.