Eid 2020 Special Mehendi: रमजान ईदच्या निमित्ताने काढलेली मेहंदी अधिक गडद करण्यासाठी 'हे' 7 नैसर्गिक उपाय एकदम सुरक्षित!
Mehendi | Photo Credits: Unsplash.com

रमजान ईद जशी बिर्याणी, शीर कुर्मा शिवाय अपूर्ण आहे तशीच महिला वर्गासाठी ती आकर्षक मेहंदी शिवाय अपूर्ण आहे. भारतामध्ये उद्या (25 मे) दिवशी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. यंदा ईदच्या सेलिब्रेशनवर कोरोना व्हायरसचं संकट असलं तरीही घरच्या घरी रमजान ईद (Ramadan Eid) साजरी करायला मुभा आहे. मग इतके दिवस लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळले असाल तर उद्याच्या ईदच्या निमित्ताने आज रात्री मेहंदीच्या (Mehendi) आकर्षक डिझाईननी तुमच्या हाताचं सौंदर्य वाढवा. मेहंदीचा रंग जितका गहिरा तितकी ती हातावर अधिक खुलून दिसते. मग यंदा मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी केमिकलचा धोका टाळत काही नैसर्गिक उपायांचा वापर करून तुम्ही मेहंदी गडद बनवू शकता. नैसर्गिक उपायांचा वापर केल्याने सहाजिकच त्वचेला होणारा त्रास देखील आटोक्यात राहण्यास मदत होते. अन्यथा बाजारातील भेसळयुक्त आणि केमिकलचा वापर करून हातावर झटपट मेहंदीचा रंग खुलवणारी मेहंदी अपायकारकच आहे. मग यंदा लॉकडाऊनमध्ये घरीच मेहंदी काढून ती अधिक गडद करण्यासाठी या काही सहजसोप्या उपायांचा नक्की वापर करून बघा.(Simple Mehndi Designs For Eid 2020: रमजान ईद च्या निमित्ताने यंदा हाता-पायावर झटपट मेहंदी काढण्यासाठी आयडिया देतील हे लेटेस्ट ट्रेन्डस Watch Videos). 

मेहंदीचा रंग गडद करणारे नैसर्गिक उपाय

  • साखर-लिंबू पाणी हे मिश्रण मेहंदी सुकल्यानंतर थोड्या वेळाने कापसाच्या बोळ्याने लावत रहा.
  • तव्यावर लवंगा टाकून त्याचा धूप मेहंदीच्या हाताला द्या. यामुळे रंग गडद होण्यास मदत होईल.
  • हाता-पायावरची काढण्यासाठी घाई करू नका. तसेच ती पाण्याने काढणं टाळा. दोन्ही हात एकमेकांवर घासून मेहंदी काढा.
  • मेहंदी पुरेशी सुकल्यानंतर काढल्यावर हातावर तेल चोळा.
  • घरच्या घरी हीना पावडरने मेहंदी बनवणार असाल तर पाण्याऐवजी चहाने मेहंदी मिक्स करा.
  • मेहंदी रात्रीच्या वेळेस काढा आणि रात्रभर हातावरच राहू द्या. सकाळी 7-8 तासांनंतर काढा.
  • मेहंदी सुकवण्यासाठी त्याला नॅचरली जितका वेळ लागत असेल तेवढा त्याला घेऊ द्या. ब्लो ड्रायरचा वापर टाळा.

भारतीय संस्कृतीमध्ये मेहंदीला विशेष महत्त्व आहे. लहान मुलींपासून सवाष्ण महिलांना त्याचं आकर्षण असतं. धर्माच्या पलिकडे जाऊन प्रत्येकीला त्यांच्या सणवारानुसार मेहंदी काढायला आवडतं. मग यंदा रमजान ईदचं औचित्य साधून तुम्ही देखील हाता पायावर जमेल तशी मेहंदी काढण्याचा नक्की प्रयत्न करा.