Lord Ganesha | (Photo Credits: Pixabay)

देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यात येते आणि अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi) विसर्जन (Visarjan). पण अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला (Sankasht Chaturthi) मस्कऱ्या गणपतीची (Mhaskarya Ganpati) स्थापना केली जाते. मस्कऱ्या गणेश उत्सव (Maskarya Ganeshotsav) हा प्रमुख्याने विदर्भात (Vidarbha) साजरा करण्यात येतो. नागपूरात (Nagpur) तर भोसले पॅलेस (Bhonsale Palace) मधील मस्कऱ्या गणपती उत्सवाला 267 वर्षांची परंपरा आहे. तसेच शेकडो वर्षापासून विदर्भात मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा आहे. 1787 मध्ये  मस्कऱ्या गणपतीची स्थापना समशेर बहाद्दर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (Shrimant Raje Khandoji Maharaj Bhonsale) ऊर्फ चिमणाबापू (Chimnabapu) यांनी बंगालवर विजय मिळवल्याचा आनंद उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पितृपक्षात मस्कऱ्या गणपती प्रतिष्ठापना केल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत.

 

पितृपक्षात कुठलीही पुजा (Worship),शुभकार्य किंवा नवीन वस्तुंची सुरुवात केली जात नाही कारण हा पितृपक्षाचा (Pitrupaksha) महिना असतो. पण विदर्भात (Vidarbha) मात्र मोठ्या भक्ती भावाने मस्कऱ्या गणपतीचं स्वागत केल्या जाते. फक्त नागपूरातचं (Nagpur) नाही वर्धा (Wardha), अमरावती (Amravati), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), भंडारा (Bhandara) या विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये मस्कऱ्या गणपतीची स्थापना केली जाते. तरी यावर्षी मस्काऱ्या गणपतीची स्थापना उद्या म्हणजेचं संकष्ट चतुर्थीला (Sankasht Chaturthi) केली जाणार आहे. उद्याची चतुर्थी मस्कऱ्याच्या स्थापनेसाठी विशेष आहे कारण उद्या अंगारीका चतुर्थी (Angarika Chaturthi) आहे. (हे ही वाचा:- Angarki Sankashti Chaturthi September 2022 Date: सप्टेंबर महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग; जाणून घ्या तारीख, व्रताचे नियम, विधी)

 

नागपूरात (Nagpur) श्रीमंत राजे खंडोजी महाराजाच्या काळात या गणपतीची 12 हाताची, 21 फुटाची मुर्ती स्थापन केली जात होती. त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी मुर्ती 12 हाताची 5 फुटाची गणेशाची मूर्ती स्थापित केल्या जाते. या मस्कऱ्या गणपतीचे विशेष महत्व म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि आजही बऱ्याच भक्तांना  या नवसाच्या म्हस्कऱ्या बाप्पाची प्रचिती येते.