Lord Ganesha (Photo credits: File image)

गणेशोत्सवाच्या धामधूमीनंतर आता भाद्रपद कृष्ण चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थीचा (Angarki Sankashti Chaturthi) योग आला आहे. 13 सप्टेंबर दिवशी अंगारकी साजरी केली जाणार आहे. गणेशभक्तांसाठी अंगारकी संकष्टी हा देखील मोठा खास योग आहे. दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते पण जर ही मंगळवारी आली तर ती अंगारकी संकष्टी होते आणि हा योग सामान्यपणे सहा महिन्यातून एकदा येतो त्यामुळे अंगारकीबाबत विशेष कुतुहल असतं.

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणेश मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. घरोघरी देखील बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. गणरायाला जास्वंद, दुर्वा वाहिल्या जातात. नैवेद्याला मोदक बनवण्याची रीत आहे. काही भाविक अंगारकी संकष्टी निमित्त दिवसभराचा उपवास करतात. सायंकाळी चंद्रोदयानंतर तो बाप्पाची आरती करून सोडला जातो. Angarki Sankashti Chaturthi Wishes: अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा HD Images, Messages द्वारा शेअर करत बाप्पाच्या भक्तांचा खास करा दिवस .

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील 13 सप्टेंबरच्या चंद्रोदय वेळा

मुंबई- 20.52

पुणे- 20.48

नाशिक- 20.47

नागपूर- 20.24

रत्नागिरी- 20.52

गोवा- 20.51

बेळगाव- 20.48

विघ्नहर्ता यांना प्रसन्न करण्यासाठी अंगारकी संकष्टी व्रत केले जाते. ज्यांना प्रत्येक महिन्याला संकष्टीचं व्रत करणं शक्य नसलेल्यांना या अंगारकी संकष्टीच्या व्रताने ते पुण्य मिळू शकतं अशी देखील धारणा आहे.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. लेटेस्टली मराठी यामधील कोणत्याच गोष्टीची पुष्टी करत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धा पसरवण्याचा देखील कोणताही उद्देश नाही.