
Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi: गणेश भक्तांसाठी दर महिन्यातील खास दिवस असतो तो म्हणजे संकष्टी चतुर्थीचा दिवस. अंगारकीचा योग वर्षात अंदाजे 1-2 वेळेसच येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी जानेवारी महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी १० तारखेला आहे. जी संकष्टी मंगळवारी येते ती अंगारकी संकष्टी म्हणून संबोधली जाते. मग आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय वातावरणामध्ये तुमच्या प्रियजनांचा, नातेवाईकांचा, आप्तेष्टांचा दिवस साजरा करण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्रं, Messages, Wishes, HD Images शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणेश मंदिरामध्ये भाविक दर्शन करण्यासाठी पोहचतात. काही जण या दिवशी दिवसभर उपवास करतात. केवळ फलाहार घेतात. Sankashti Chaturthi 2023 Full Calendar: अंगरकीने यंदाच्या वर्षी संकष्टी चतुर्थींची सुरूवात; जाणून घ्या वर्षभरातील संकष्टीच्या तारखा आणि चंद्रोदयाच्या वेळा
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा





अंगारकी संकष्टीला बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. यानिमित्ताने व्रत करणारी मंडळी रात्री चंद्रोदयापूर्वी गणरायाची आरती करून चंद्रोदय झाला की व्रताची सांगता करतात. सारी विघ्नं दूर सारून मनोकामना पूर्ण करण्यासाठी अंगारकीचं व्रत केले जाते.