Ganpati Bappa Morya | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

गणेश भक्तांसाठी दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi)  हा दिवस खास असतो. कृष्ण पक्षातील चौथा दिवस हा संकष्टी चतुर्थी म्हणून साजरा करण्याची रीत आहे. दर महिन्यात येणार्‍या विनायकी आणि संकष्टी चतुर्थी मध्ये संकष्टीला अनेकजण व्रत पाळतात. दिवसभराचा उपवास करतात. काही दिवसांपूर्वीच आपण नव्या वर्षात अर्थात 2023 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या वर्षातील संकष्टी चतुर्थी च्या तारखा काय आहेत? त्याच्या वेळा काय आहेत? याची माहिती जाणून घ्या.

दर मंगळवारी काही गणेशभक्त आवर्जुन गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. त्यामुळे जर मंगळवार आणि संकष्टी चतुर्थी हा योग जुळून आला तर ती संकष्टी चतुर्थी ही अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाते. नव्या वर्षातील पहिली संकष्टी ही अंगारकी संकष्टी (Angaraki Sankashti Chaturthi) आहे. नक्की वाचा: प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं सिंदूर लेपन संपन्न; पहा सिंदूर लेपनानंतरचं बाप्पाचं पहिलं रूप.

संकष्टी चतुर्थी 2023 च्या तारखा, वेळा  

 

Date Day Sankashti Chaturthi 2023 Sankashti Chaturthi Timing Sankashti Chaturthi Vrat Moonrise Timing 
January 10, 2023  Tuesday Lambodara Sankashti Chaturthi Begins - 12:09 pm, Jan 10

Ends - 02:31 pm, Jan 11

09:10 pm
February 9, 2023  Thursday Dwijapriya Sankashti Chaturthi Begins - 06:23 am, Feb 09

Ends - 07:58 am, Feb 10

09:25 pm
March 11, 2023  Saturday Bhalachandra Sankashti Chaturthi Begins - 09:42 pm, Mar 10

Ends - 11:05 pm, Mar 11

09:45 pm
April 9, 2023  Sunday Vikata Sankashti Chaturthi Begins - 09:35 am, Apr 09

Ends - 08:37 am, Apr 10

09:30 pm
May 8, 2023  Monday Ekadanta Sankashti Chaturthi Begins - 06:18 pm, May 08

Ends - 04:08 pm, May 09

09:23 pm
June 7, 2023  Wednesday Krishnapingala Sankashti Chaturthi Begins - 12:50 am, Jun 07

Ends - 09:50 pm, Jun 07

10:16 pm
July 6, 2023  Thursday Gajanana Sankashti Chaturthi Begins - 06:30 am, Jul 06

Ends - 03:12 am, Jul 07

09:53 pm
August 4, 2023  Friday Gajanana Sankashti Chaturthi Begins - 12:45 pm, Aug 04

Ends - 09:39 am, Aug 05

09:17 pm
September 3, 2023  Sunday Heramba Sankashti Chaturthi Begins - 08:49 pm, Sep 02

Ends - 06:24 pm, Sep 03

09:20 pm
October 2, 2023  Monday Vighnaraja Sankashti Chaturthi Begins - 07:36 am, Oct 02

Ends - 06:11 am, Oct 03

08:42 pm
November 1, 2023  Wednesday Vakratunda Sankashti Chaturthi Begins - 09:30 pm, Oct 31

Ends - 09:19 pm, Nov 01

09:06 pm
November 30, 2023  Thursday Ganadhipa Sankashti Chaturthi Begins - 02:24 pm, Nov 30

Ends - 03:31 pm, Dec 01

08:44 pm
December 30, 2023  Saturday Akhuratha Sankashti Chaturthi Begins - 09:43 am, Dec 30

Ends - 11:55 am, Dec 31

09:11 pm

संकष्टीच्या व्रतामध्ये चंद्रोदयही खास असतो. चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पाची पूजा करून दिवसभराचा उपवास सोडला जातो. गणराय हा विघ्नहर्ता असल्याने सारी संकटं दूर करण्यासाठी त्याची आराधना केली आहे.

उत्तर भारतीयांसाठी कार्तिक महिन्यातील हा चतुर्थीचा दिवस खास असतो. हा दिवस ते करवा चौथ म्हणून साजरा करतात. अनेक सवाष्ण स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभराचा निर्जळी उपवास करतात.