Happy New Year 2023 (File Image)

बघता बघता 2022 वर्ष संपत आले. आता लोक 2023 ची म्हणजेच नवीन वर्षाची (New Year 2023) आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन वर्षाबाबत नेहमीच लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. अनेक लोक हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. काहीजण पार्टी करतात, काहीजण बाहेर फिरायला जातात तर काही लोक दान-धर्म करून नवीन वर्षाचे स्वागत करतात. 31 डिसेंबरच्या रात्रीपासून सुरू होणारा नववर्षाचा उत्सव पुढील एक-दोन दिवस चालतो. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नवीन वर्ष नेहमीच 1 जानेवारीला साजरे केले जात नव्हते. अनेक वर्षांपूर्वी नवीन वर्षाची सुरुवात मार्चपासून होत होती.

रोमन शासक ज्युलियस सीझरने 1 जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू केल्याचे सांगितले जाते, त्याआधी मार्चमध्ये नववर्ष साजरे होत असे. परंतु अधिकृतरीत्या जानेवारीपासून नववर्ष साजरे करण्याची सुरुवात पोप ग्रेगरी XIII यांनी 15 ऑक्टोबर 1582 पासून केली. त्याआधी रोमचा राजा नुमा पॉम्पिलस याने रोमन कॅलेंडरमध्ये आवश्यक बदल केले आणि जानेवारी महिन्याचा समावेश कॅलेंडरमध्ये करण्यात आला आणि तो वर्षाचा पहिला महिना मानला गेला.

तर सध्या अनेक देशांमध्ये नववर्षाची सुरुवात झाली आहे, भारतही लवकरच नववर्षाचे स्वागत करेल. अशावेळी काही खास Messages, WhatsApp Status, Quotes, Wishes, Greetings पाठवून तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला, शेजाऱ्यांना, आप्तेष्टांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Happy New Year 2023
Happy New Year 2023
Happy New Year 2023
Happy New Year 2023
Happy New Year 2023
Happy New Year 2023

दरम्यान, जगभरात नवीन वर्षाचा उत्सव हा गेले 4000 वर्षे साजरा होत आहे. पृथ्वीवर दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेट समूहावरील टोंगा हा देश सर्वात आधी नवीन वर्ष साजरे करतो. किरिबाटी मधील किरितीमाती बेट हेदेखील नवीन वर्ष साजरे करणारे पहिले ठिकाण आहे. त्यानंतर यानंतर न्यूझीलंड, सिडनीचा (ऑस्ट्रेलिया) क्रमांक लागतो. अखेर सर्वात शेवटी हॉलँड आणि बेकर या निर्जन बेटांवर नवीन वर्ष सुरु होते.