हिंदू संस्कृतीच्या सणसमारंभांमधून ऋतूचक्रामध्ये होणार्या बदलांच्या अनुषंगाने काही रीती-परंपरा असतात. होळी (Holi) हा सण वसंत ऋतूची चाहूल देणारा आहे. थंडी ओसरून वातावरण तापायला लागलं की होळी येते. वसंत ऋतूमध्ये निसर्गच मुक्तहस्ते उधळण करत असते. तोच प्रकार धुळवडीच्या निमित्ताने केला जातो. यंदा होलिकादहन (Holikadahan) 17 मार्च आणि धूळवड (Dhulwad) 18 मार्च दिवशी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने तुमच्या प्रियजणांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना या होलिका उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही ग्रीटिंग्स तुम्ही शेअर करू शकता. दरम्यान होळीच्या निमित्ताने होलिकादहनाच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस,Wishes, HD Images, GIFS शेअर करत आनंदाची देखील उधळण करा.
होलिकोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी लोकं एकत्र जमून होळी पेटवतात. त्यामुळे झाडाचा पालापाचोळा, सुकी लाकडं फांद्या यांच्यासमवेत नकारात्मकता, अमंगल गोष्टींचा नाश व्हावा अशी कामना केली जाते. हे देखील नक्की वाचा: Holika Dahan 2022 Dos and Don'ts: पांढरे कपडे न घालण्यापासून ते चारमुखी दिवा लावण्यापर्यंत, होलिका दहनाला हे उपाय केल्यास लक्ष्मी सदैव नांदेल घरात .
हॅप्पी होळी 2022 मराठी शुभेच्छा
होळी पेटू दे
रंग उधळू दे
मतभेद मिटू दे
प्रेमच प्रेम सर्वत्र बहरू दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी पेटू दे
द्वेष जळू दे
आयुष्यात तुमच्या
नवआनंद पसरू दे
होलिका दहानाच्या हार्दिक शुभेच्छा
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये
दु:ख, मत्सर, निराशेचे दहन होवो
आयुष्यात तुमच्या आनंद, सुख, शांती नांदो
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होलिका दहानाच्या हार्दिक शुभेच्छा
दहन व्हावे अमंगलाचे, पूजावे श्रीफळ संवादाचे
नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा
आनंद घेऊन येई सण हा होळीचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
फाल्गुण पौर्णिमेच्या रात्री पेटवू
नकारत्मकेची होळी
आनंदाने भरो आपली झोळी
साजरी करुया रंगबेरंगी होळी...
होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीचा सण भारतभर विविध स्वरूपात साजरा केला जातो. महाराष्ट्रात कोकण प्रांतात हा सण शिमगोत्सव म्हणून साजरा करतात. फाक पंचमीपासून त्याला सुरूवात होते. यानिमित्ताने देवाच्या पालख्या नाचवल्या जातात. मग या सणाचा निमित्ताने तुमच्या प्रियजणांच्या आयुष्यातील आनंद देखील द्विगुणित करायला विसरू नका.