Happy Friendship Day 2020 Wishes: हॅप्पी फ्रेंडशिप डे म्हणताना मराठी  Messages, Whatsapp Status शेअर करून द्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा
Happy Friendship Day Marathi Wishes (Photo Credits: File)

Happy Friendship Day 2020 Marathi Wishes:लॉक डाऊन मध्ये मित्रांना मिस करताय ना? चहाच्या टपरी वरचा, कॉलेजच्या कँटीन मधला, लेक्चरला मागच्या बाकावर बसून, केलेला उगाचचा थिल्लरपणा , ऑफिस मध्ये, ट्रेन मध्ये, भेटणारा सगळा मित्रपरिवार सगळं सगळं या लॉक डाऊन मध्ये खूप आठवतंय, हो ना? आमचीही अगदी अशीच परिस्थिती आहे. अशावेळी आता यंदाचा फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दिनाचा मोठा सोहळा सुद्धा तोंडावर आलाय, दरवर्षी प्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी (2 ऑगस्ट) रोजी आपल्याकडे फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी उगाच इमोशनल होऊन मित्रांना भेटायला वैगरे जाऊ नका पण त्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या जिवलग मित्रांना शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करा. नाही नाही शुभेच्छा शोधायला लागणार नाहीत याची काळजी पण आम्ही घेतलीये. तुम्हाला सर्व प्रकारच्या मित्रांना पाठवता येतील असे काही खास मराठी Messages, Wishes, Greetings खाली दिलेले आहेत, ते फक्त डाउनलोड करून तुम्ही तुमच्या Whatsapp Status, Facebook वरून शेअर करू शकता.

फ्रेंडशिप दिनानिमित्त Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून आपल्या अंतरंगी मित्रांना द्या मजेशीर शुभेच्छा!

हॅप्पी फ्रेंडशिप डे मराठी शुभेच्छा

Last Minute शिक्षक बनणाऱ्या

Breakup चं रडगाणं ऐकून घेणाऱ्या

Party साठी माझ्या घरच्यांना पटवणाऱ्या

आणि प्रत्यक्ष सोबत नसूनही मनाने जोडलेल्या

प्रत्येकाला, Happy Friendship Day!

Happy Friendship Day Marathi Wishes (Photo Credits: File)

वेळेसोबत बदलले असले

तरी तुमच्यापासून दुरावलेले नाही

एका फोनवर अजूनही हजर होईन

कारण आपलं नातं मी विसरलेले नाही

मित्रांनो..

Happy Friendship Day!

Happy Friendship Day Marathi Wishes (Photo Credits: File)

अगदी तू आयुष्याचा श्वास वैगरे म्हणणार नाही

पण मित्रा तू नक्की माझ्यासाठी खास आहेस

Happy Friendship Day

Happy Friendship Day Marathi Wishes (Photo Credits: File)

रोज आठवण यावी असं काही नाही

रोज भेट व्हावी याची गरज नाही

तरीही मी तुला विसरणार नाही

याला खात्री म्हणतात

आणि ही खात्री दोघांना असणं

त्याला मैत्री म्हणतात

Happy Friendship Day!

Happy Friendship Day Marathi Wishes (Photo Credits: File)

चहा- सिगरेट शेअर करताना झालेली मैत्री

सुख- दुःख शेअर करण्यापर्यंत कधी पोहचली कळलंच नाही

तुम्हाला सर्वांना Happy Friendship Day

Happy Friendship Day Marathi Wishes (Photo Credits: File)

आपले मित्र आयुष्य (बहुतांश वेळा) सोप्प करतात, एखादा वाईट दिवस असेल तर तो क्षणात खास करतात, त्यामुळे आता या फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने या शुभेच्छांसोबतच तुम्हाला तुमच्या मित्राचा दिवस आणखीन खास करता येईल. यासाठी एखादा पर्सनल संदेश सुद्धा लिहून पाठवू शकता. व्हिडीओ कॉल करून त्यांच्याशी गप्पा मारू शकता. तुम्हा सर्वांना आमच्या कडूनही हॅप्पी फ्रेंडशिप डे!