Happy Dasara Wishes in Marathi: ‘दसरा’ (Dussehra 2021) हा हिंदू धर्मामधील महत्वाच्या सणांपैकी एक आहे. आश्विन शुद्ध दशमी दिवशी हा उत्सव साजरा होतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेला देवीचे घट बसून नवरात्राला सुरुवात होते त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. चांगल्याचा वाईटावर विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय, या हा सणामागील अर्थ आहे. यंदा 15 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच विजय नावाचा मुहूर्त असतो व त्या वेळी जे काम हाती घ्यावे त्यात यश मिळते, असे पुराणांत सांगितले आहे. त्यामुळे हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे.
14 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 6.52 पासून अश्विन मास शुक्ल पक्ष दशमीची तिथी सुरु होऊन, तिची समाप्ती 15 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 06.02 वाजता होणार आहे, यंदा विजय मुहूर्त 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:21 पासून ते 03:07 पर्यंत असणार आहे. तर अशा या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही विजया दशमीचे मेसेजेस, Sms, Greatings, Wishes, HD Images, Gifs पाठवून आप्तेष्टांना, मित्र मंडळींना शुभेच्छा देऊ शकता.
झेंडुची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात
विजया दशमीचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात पाऊस पडो सुवर्णांचा...
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
सोन्यासारख्या लोकांना, हॅप्पी दसरा!
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोने लुटण्याचा,
नवे, जुने विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
दसऱ्याच्या शुभेच्छा!
निसर्गाचे दान, आपट्याचे पान
त्याला सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा!
झेंडूची फुले केशरी, वळणा वळणाचे तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीतच न्यारी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दरम्यान, शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले. त्यानंतर दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला, अशी एक आख्यायिका आहे. या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले असेही सांगितले जाते. तसेच याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून सीतामाईची सुटका केली असेही पुराणात म्हटले आहे.
यादिवशी शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करून सोने लुटतात. या दिवशी सीमोल्लंघन करून मराठा सरदार नव्या मोहिमेवर निघत असत. हा दिवस शुभ असल्यामुळे हिशेबाच्या वह्या, जुन्या पोथ्या, यंत्रे, शस्त्रे इ. वस्तूंचे पूजनही या दिवशी करतात.