जगभरात चॉकलेट हा आबालवृद्धांमध्ये अगदी आवडीचा पदार्थ आहे. प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स आता उपलब्ध आहेत. त्यामध्ये चव वेगवेगळी असते त्यामुळे अनेकांची आवडही वेगळी असते. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात वेलेंटाईन वीक मध्येही चॉकलेट डे (Chocolate Day) साजरा केला जातो. पण जगभरात ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार सातव्या महिन्याच्या सातव्या दिवशी अर्थात 7 जुलै ला चॉकलेट डे साजरा करण्याचं विशेष महत्त्व आहे. यंदा चॉकलेट डे च्या निमित्ताने तुमच्या जवळच्या लोकांना या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी टीम लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही ग्रीटिंग्स तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. (नक्की वाचा: वर्ल्ड चॉकलेट डे च्या शुभेच्छा मराठी Messages, Wishes, Greeting द्वारा शेअर करून खास करा 'चॉकलेट प्रेमींचा' आजचा दिवस!).
डार्क चॉकलेट ते मिल्क चॉकलेट अशा वेगवेगळ्या चवींमध्ये चॉकलेट्स उपलब्ध आहेत. काहींसाठी चॉकलेट हे औषध आहे तर काहींना वाईट मूड मधून, कटू प्रसंगातून मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यासाठी बुस्टर आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या चॉकलेट विषयी आठवणी या वेगवेगळ्या आहेत.
त्यामुळे गिफ्ट्सच्या स्वरूपात चॉकलेट देण्याची देण्याकडे देखील अनेकांचा कल असतो.
चॉकलेट डे च्या शुभेच्छा
आजकाल फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर Messages, Wishes, Greetings च्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासोबत व्हॉट्सअॅप स्टिकर हा देखील एक पर्याय समोर आला आहे. याच्या माध्यमातून देखील मेसेज एका अनोख्या पद्धतीत दिला जातो. यंदा तुम्हीदेखील येथून चॉकलेट डे च्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा पॅक डाऊनलोड करू शकता.