जगभरात आबालवृद्धांना आवडणारा एक गोड पदार्थ म्हणजे चॉकलेट (Chocolate)! आज, 7 जुलै हा दिवस जगभरात वर्ल्ड चॉकलेट डे (World Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो. आनंदाचा प्रसंग असो, बिघडलेला मूड सुधारायचा असो किंवा अगदी अगदी कुणाला धन्यवाद म्हणून आपली कृतज्ञता व्यक्त करायची असो या प्रसंगांमध्ये हमखास तुम्हांला चॉकलेट मदत करते. मग आज जगभर साजरा केला जाणारा चॉकलेट डेचा आनंद तुम्हांला द्विगुणित करायचा असेल तर सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूकच्या (Facebook) माध्यामातून चॉकलेट डे च्या शुभेच्छा देणारी ग्रिटिंग्स, विशेस, मेसेजेस, HD Images शेअर करून तुम्ही आजचा दिवस सेलिब्रेट करू शकता.
जगात 7 जुलै हा चॉकलेट डे म्हणून का साजरा केला जातो? याचं नेमकं कारण ठाऊक नाही. मात्र जगभरातील चॉकलेट प्रेमी आजचा दिवस आनंदाने साजरा करतात. विविध प्रकारच्या चॉकलेट्सचा आनंद घेतला जातो. मग आज तुमच्या प्रिय व्यक्तींना तुम्ही थेट भेटून किंवा आवडीच्या चॉकलेट्स आऊट्लेटमध्ये जाऊन पदार्थांवर ताव मारू शकत नसला तरीही तुम्ही आज चॉकलेट डे एका वेगळ्या अंदाजात मजेशीर मेसेजेस शेअर करून नक्की सेलिब्रेट करू शकता. मग आजच्या वर्ल्ड चॉकलेट डे निमित्त नक्की शेअर करा हे मेसेजेस!
चॉकलेट डे 2020 च्या शुभेच्छा
दरम्यान आज बाहेर जाऊन तुम्ही चॉकलेट खरेदी करू शकत नसलात तरिही घरच्या घरी तुम्ही काही चॉकलेट्स अगदीच सहज बनवू शकता. मग आजचा तुमचा चॉकलेट डे घरच्या घरीच तुम्ही कसा सेलिब्रेट करणार आहात? हे आम्हांलाही नक्की सांगा. लेटेस्टली परिवाराकडून तुम्हांला आजच्या चॉकलेट डेच्या खूप सार्या शुभेच्छा!