हिंदू धर्मीय चैत्र पौर्णिमेचा दिवस हा हनुमान जयंती (Hanuman Jayanati) म्हणून साजरा करतात. श्रीरामाचे भक्त आणि पवनपुत्र बजरंग बली अर्थात हनुमानाचा जन्मदिवस हा हनुमान जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्याची प्रथा परंपरा आहे. यंदा हनुमान जयंती शनिवार 16 एप्रिल दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवसानिमित्त हनुमानाच्या जयंती तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, प्रियजणांना देण्यासाठी ही खास मराठामोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Images, Wishes, Quotes या निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
पुराणात सांगितलेल्या कथेप्रमाणे अमरत्वाच्या प्राप्तीसाठी जेव्हा देव आणि राक्षसांमध्ये युद्ध पेटलं तेव्हा समुद्रमंथनातून अमृत असूरांनी पळवलं. त्यावेळेस भागवान शिवाने वीर्य त्याग केला आणि पवनदेव (वायुदेवता) वानरराज केसरी यांची पत्नी अंजना यांच्या गर्भामध्ये प्रवेश झाला. त्यामधून अंजनाने हनुमानाला जन्म दिला. हा दिवस चैत्र पौर्णिमेचा असल्याने या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. Hanuman Jayanti 2022 Greetings & Messages:हनुमान जयंतीच्या दिवशी कुटुंब आणि मित्रांना WhatsApp संदेश , शुभेच्छा, बजरंगबलीचे फोटो आणि HD वॉलपेपर पाठवून द्या शुभेच्छा .
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहेस तू
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सूर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला,
बोला जय जय हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंती निमित्त शुभेच्छा
महाराष्ट्रात हनुमानाला 'मारूती' असं देखील संबोधलं जातं. मारुतीरायाला प्रसन्न करून आत्मबळ प्राप्त होत असल्याची भक्तांची भावना असल्याने हनुमान जयंतीचा उत्सव जगभरातील हनुमान भक्त उत्साहाने साजरा करतात. यंदा कोरोना संकट कमी झाल्याने निर्बंधमुक्त वातावरणामध्ये पुन्हा 2 वर्षांनी साजरी केली जाणार आहे.