मकर संक्रांती(Makar Sankranti) 2021 हा सण यंदा 14 जानेवारी रोजी साजरा केला जाईल.प्रत्येक राज्यात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हा सामाजिक मेळाव्याचा एक प्रकार आहे ज्यात मित्र मैत्रिणी, नातेवाईक सर्व जण एकत्र येऊन हा सण साजरा करतात.या जानेवारी महिन्यात महिलांसाठीचा आणखीन एक महत्वाचा सोहळा असतो तो म्हणजे हळदी कुंकू. सगळ्या महिला एकत्र येऊन साजरा होणारा हा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी महिला खुप उत्साही असतात. वेगवेगळे खेळ, गप्पा, धम्माल अस सगळ काही महिला या हळदी कुंकू च्या समारंभात करतात. काही महिला आपल्या घरात ही हळदी कुंकू समारंभ ठेवतात.ज्यात त्यांच्या जवळच्या महिलांना आंमत्रित केले जाते. (Makar Sankranti 2021 Tilgul Recipe: यंदा मकर संक्रांतीला घरीच बनवा तिळगुळ, जाणून घ्या कसे बनवतात रंगेबीरंगी हलवा )
सध्या कोरोनाच्या वातावरणात सगळ्यांच्या घरी आमंत्रण घेऊन जाणे सगळ्यांनाच शक्य होईल असे नाही.पण त्याची तुम्ही चिंता करू नका कारण घरबसल्या तुम्ही तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या हळदी कुंकू समारंभाला कसे आमंत्रण दयाल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.सध्याच जग हे सोशल मिडियाचे जग आहे असे म्हणायला हरकत नाही.कारण लहानांपासून ते अगदी वृद्धांनपर्यंन्त सगळेच जण हल्ली सोशल मिडियाचा वापर करतात.तेव्हा तुम्ही तुमच्या हळदी कुंकू समारंभाचे आमंत्रण सोशल मिडीयाद्वारे पाठवू शकता. पण ते बनवायचे कसे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची ही चिंता करू नका.आम्ही त्याचे ही काही नमूने तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. (Haldi Kunku Rangoli Designs: हळदी कुंकूवाच्या दिवशी दारापुढे काढा या सोप्या आणि सुंदर रांगोळी )
नमूना 1
नमूना 2
Invitation Card Message
विसरुनी सारी कटुता,नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा ,
एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा...
दिनांक ..... रोजी एकत्र भेटून हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे, याकरिता आग्रहाचे आमंत्रण..
स्थळ: वेळ:
नमूना 3
Invitation Card Message
Let us celebrate the festival of Makar Sankranti 2021 together,
exchange Tilgul and express sweetness with one another...
We invite you to your humble abode on ...
Date: ...
Address: ...
Time: ...
नमूना 4
आहे की नाही बेस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून अस यूनिक आमंत्रण द्यायची आयडिया.तेव्हा यंदा तुम्ही ही आमंत्रणाची ही पद्धत नक्की ट्राय करुन पाहा. लेटेस्टली मराठी च्या टीम कडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.