
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Messages: मराठा साम्राज्याची स्थापना करणारे मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ख्याती संपूर्ण देशभरात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोंसले हे विजापूर सल्तनतीच्या सैन्यातील एक महान मराठा सेनापती होते. शिवाजी महाराज हे भारतातील महान मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते 17 व्या शतकातील सर्वात शूर आणि अद्भुत शासकांपैकी एक होते.
शिवाजी महाराजांना रामदास स्वामींकडून प्रेरणा मिळाली. त्यांनी रामदास स्वामींना आपले धर्मगुरू मानले. दरवर्षी 3 एप्रिल रोजी शिवरायांची पुण्यतिथी (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024) देशभरात साजरी केली जाते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही त्यांच्या स्मृतीस कोट्स, संदेश, WhatsApp स्टेटस, Facebook मेसेज शेअर करून अभिवादन करू शकता. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही ईमेजेस घेऊन आलो आहोत. या ईमेज तुम्ही मोफत डाऊनलोड करू शकता.
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक ''मर्द मराठा शिवबा'' होऊन गेला.
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन!

रयतेपायी तो जन्मभर झिजला...
रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला...
मानवतेच्या त्या झर्यापुढे काळही थिजला...
असा एक शिवसूर्य रायगडी निजला...!
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!

राजे तुम्ही होता म्हणून दिसले
मंदिरांना कळश आणि दारात तुळस
राजे तुम्ही होता म्हणून भरुन राहिले सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!

शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे. आणि जो शिवरायांना स्वत:च्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन!

इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर मातीच्या कणावर
आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती!
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन!

3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यात शिवाजीचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, त्याचा मृत्यू नैसर्गिक होता. तसेच काही इतिहासकारांच्या मते त्यांना विष देण्यात आले. यानंतर त्यांची प्रकृती खालावली.