Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Messages: थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ख्याती संपूर्ण देशभरात आहे. शिवाजी हे भारताचे एक महान योद्धा आणि रणनीतीकार होते, ज्यांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यांनी औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याविरुद्ध अनेक वर्षे लढा दिला. 1674 मध्ये रायगड येथे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले.

3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर शिवरायांचा मृत्यू झाला. मात्र, शिवराजांच्या मृत्यूच्या तारखेमध्ये दोन भिन्न विचार आहेत. काही शिवभक्त इंग्रजी कालनिर्णयानुसार, त्यांची पुण्यतिथी साजरी करतात. तर काही तिथीनुसार येणाऱ्या तारखेला पुण्यतिथी (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi) साजरी करतात. यंदा 23 एप्रिल रोजी शिवाजी महाराजांची तिथीनुसार पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार येणाऱ्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही Images, Whatsapp Status द्वारे शिवरायांना अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता..

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

श्वासात रोखूनी वादळ,

डोळ्यांत रोखली आग,

देव आमचा छत्रपती,

एकटा मराठी वाघ..

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता..

झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता..

जय भवानी.. जय शिवाजी..

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव...

महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती

ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती

आमचं दैवत

राजा शिवछत्रपती

छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथिनिमित्त त्रिवार वंदन!

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथिनिमित्त त्रिवार अभिवादन!

शिवाजी महाराजांनी गनिमी युद्धाची नवीन शैलीही विकसित केली. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि न्यायालयीन शिष्टाचारांचे पुनरुज्जीवन केले. फारसी ऐवजी मराठी आणि संस्कृत या अधिकृत भाषांचा विकास केला.