गुड फ्रायडे (Good Friday) हा ख्रिस्ती बांधवांसाठी महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. Maundy Thursday नंतर आधी Easter Sunday च्या आधी तो पाळला जातो. ख्रिस्ति धर्मीयांचा पवित्र ग्रंथ बायबल मध्ये दिलेल्या माहितीनुसार गुड फ्रायडेच्या दिवशीच प्रभू येशू ला सूळावर चढ्वण्यात आले होते. ख्रिस्ती धर्मीयांची अशी धारणा आहे की या दिवशी प्रभू येशू यांनी जगातील सारी पापं त्यांच्यासोबत स्वर्गामध्ये नेली. त्यामुळे मानवजातीसाठी प्रभू येशू यांचं बलिदान विशेष मानलं जातं. या बलिदानाच्या स्मरणार्थ चर्च मध्ये 3 वाजता प्रार्थना केली जाते. भारताप्रमाणेच स्पेन, इटली, फिलिपाईन्स मध्ये यात्रा काढून येशूच्या बलिदानाचा हा दिवस पाळला जातो. मग यंदा 2 एप्रिल दिवशी जगभर गुड फ्रायडे निमित्त विशेष प्रार्थना, उपवास आणि मौन पाळताना तुमच्या मित्रमंडळींसोबत, नातेवाईकांसोबत या दिवशी येशूचं स्मरण करताना व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रॅम, ट्वीटर च्या माध्यमातून Good Friday Images, Photos, Messages शेअर करायला विसरू नका. Good Friday 2021 Quotes: प्रभू येशूच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी Inspirational Messages, Images !
भारतामध्ये यंदा कोरोना संकट पुन्हा थैमान घालत असल्याने इतर सणांप्रमाणे ईस्टर आणि गुड फ्रायडे देखील अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्याचं आवाहन सरकार कडून करण्यात आलं आहे.
गुड फ्रायडे इमेजेस
जगभरात गुड फ्रायडे हा दिवस होली डे, ग्रेट फ्रायडे किंवा ब्लॅक डे या नावाने देखील ओळखला जातो. गुड फ्रायडे हा चांगुलपणाचा दिवस मानला जातो. त्यामुळेच अनेकजण या दिवशी समाज उपयोगी कामांमध्ये स्वतःला गुंतवतात. वृक्षारोपण, दान धर्म या दिवशी करून गुड फ्रायडे साजरा केला जातो.