Ganeshotsav 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, रश्मी ठाकरे, प्रतिभा पवार यांनी घेतले वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन
Varsha Bungalow Ganeshotsav 2020 | (Photo Credits: Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), संजय राऊत, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन आज सहपरीवार घेतले. या वेळी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), प्रतिभा पवार (Pratibha Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), सदानंद सुळे (Sadanand Sule) यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर प्रतिवर्षी गणरायाचे आगमन होते. त्या त्या वर्षी असलेले मुख्यमंत्री गणरायाची पूजा सपत्नीक करतात. यंदाही वर्षा बंगल्यावर गणरायाचे आगमन झाले. यंदा विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावरील गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी कोरना संकटापासून राज्याला लवकर मुक्ती मिळावी अशी प्रार्थाना केली आहे. तसेच, राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.  (गणपती विसर्जन कसे करतात? जाणून घ्या उत्तर पूजा विधी ते व्हर्च्युअल गणेश विसर्जनाचे प्लॅन्स!)

दरम्यान, राज्यावर यंदा कोरोना व्हायरस संकटाचे सावट आहे. त्यामुळे गेली सहा महिने विविध उत्सव साजरे करण्यावर बंधने आहेत. 24 मार्च पासून गणेशोत्सवापर्यंत आलेले सर्व उत्सव नागरिकांनी घरीच साजरे केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करण्यास सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे नागरिकांना सर्व आटी, शर्थी पाळूनच नागरिकांना उत्सव साजरे करावे लागत आहेत.